S M L

लवासाच्या कामगारांची उपासमार ; काम सुरू करण्याची मागणी

21 फेब्रुवारी'लवासा' प्रकल्पाचं बंद पडलेलं काम त्वरित सुरु करावे या मागणीसाठी लवासा समर्थक शेतकर्‍यांनी पुणे जिल्हा कार्यालयासमोर धरणे धरली होती. पर्यावरण मंत्रालयाने या प्रकल्पाला 'काम थांबवा' असे आदेश दिले होते त्यानुसार या प्रकल्पाचं काम मागच्या दोन महिन्यापासून बंद आहे त्यामुळे या प्रकल्पावर काम करणार्‍या हजारो कामगारांची उपासमार होत आहे. त्याचबरोबर या प्रकल्पामुळे परिसरातील अनेक शेतकर्‍यांचा विकास होत असताना प्रकल्पाच काम बंद पडल्याने सगळ्यांचंच नुकसान होत असल्याचं या आंदोलकांच म्हणणं आहे. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आज ही निदर्शन केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 21, 2011 01:07 PM IST

लवासाच्या कामगारांची उपासमार ; काम सुरू करण्याची मागणी

21 फेब्रुवारी

'लवासा' प्रकल्पाचं बंद पडलेलं काम त्वरित सुरु करावे या मागणीसाठी लवासा समर्थक शेतकर्‍यांनी पुणे जिल्हा कार्यालयासमोर धरणे धरली होती. पर्यावरण मंत्रालयाने या प्रकल्पाला 'काम थांबवा' असे आदेश दिले होते त्यानुसार या प्रकल्पाचं काम मागच्या दोन महिन्यापासून बंद आहे त्यामुळे या प्रकल्पावर काम करणार्‍या हजारो कामगारांची उपासमार होत आहे. त्याचबरोबर या प्रकल्पामुळे परिसरातील अनेक शेतकर्‍यांचा विकास होत असताना प्रकल्पाच काम बंद पडल्याने सगळ्यांचंच नुकसान होत असल्याचं या आंदोलकांच म्हणणं आहे. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आज ही निदर्शन केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 21, 2011 01:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close