S M L

गिरणी कामगारांना 1 मे रोजी होणार घरांचे वाटप

21 फेब्रुवारीदिवाळीचा मुहूर्त टळल्यानंतर आता महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधत 1 मे रोजी मुंबईतल्या गिरणी कामगारांना घरांचे वाटप करण्यात येणार आहे. 6948 घरांचे वाटप गिरणी कामगारांना परवडणा-या दरात करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती घरांच्या किंमतीबाबतचे योग्य धोरण ठरवून साडेआठ लाखांच्या जवळपास गिरणी कामगारांच्या घराची किंमत निश्चित करण्याची शक्यता आहे. तसेच 58 पैकी 38 मिल मालकांनी अद्याप गिरणी कामगारांच्या घरांची एक तृतियांश जागा सरकार हवाली केलेली नाही. त्यामुळे आडमुठ्या मिल मालकांना 31 मार्चच्या आत एक तृतियांश जमीन सरकारच्या ताब्यात देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच जमीन सरकारच्या हवाली न करणा-या मिलमालकांवर कारवाई करण्याचंही सरकारनं ठरवलं आहे अशी माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 21, 2011 05:04 PM IST

गिरणी कामगारांना 1 मे रोजी होणार घरांचे वाटप

21 फेब्रुवारी

दिवाळीचा मुहूर्त टळल्यानंतर आता महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधत 1 मे रोजी मुंबईतल्या गिरणी कामगारांना घरांचे वाटप करण्यात येणार आहे. 6948 घरांचे वाटप गिरणी कामगारांना परवडणा-या दरात करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती घरांच्या किंमतीबाबतचे योग्य धोरण ठरवून साडेआठ लाखांच्या जवळपास गिरणी कामगारांच्या घराची किंमत निश्चित करण्याची शक्यता आहे.

तसेच 58 पैकी 38 मिल मालकांनी अद्याप गिरणी कामगारांच्या घरांची एक तृतियांश जागा सरकार हवाली केलेली नाही. त्यामुळे आडमुठ्या मिल मालकांना 31 मार्चच्या आत एक तृतियांश जमीन सरकारच्या ताब्यात देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच जमीन सरकारच्या हवाली न करणा-या मिलमालकांवर कारवाई करण्याचंही सरकारनं ठरवलं आहे अशी माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 21, 2011 05:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close