S M L

सिंहगड इन्सिट्युटच्या वादातून माजी गुरू-शिष्यांमध्ये जुंपली

प्राची कुलकर्णी, पुणे22 फेब्रुवारी लोणावळा इथली सिंहगड इन्स्टिट्युटची जमीन ही वनखात्याची आहे. तिथे झालेलं बांधकाम पाडुन टाकावं असे आदेश कोर्टाने दिले आहेत. मात्र अजुनही सरकार यावर काहीही कारवाई का करत नाही असा प्रश्न भ्रष्टाचार विरोधी मंचाचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे. मात्र वनमंत्री पतंगराव कदम हे आमच्या संस्थेला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारची कारस्थान करत असल्याचा थेट आरोप सिंहगड इन्सिट्युटचे अध्यक्ष एम.एन. नवले यांनी केला आहे. पुण्यातल्या लोणावळा येथील सिंहगड इन्सिट्युटची शाखेची जमीन वनखात्याच्या अख्यत्यारित असल्याचं लक्षात आल्यानंतर वनविभागाने कोर्टामध्ये सिंहगड संस्थेच्या विरोधात याचिका दाखल केली. या याचिकेवर निर्णय देताना हायकोर्टाने ही जमीन वनखात्याची असल्याचं मान्य के लं असल्याची माहिती भ्रष्टाचार विरोधी मंचाचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी माहितीच्या अधिकारात मिळवली आहे. सिंहगड संस्था उभी करणारे नवले हे पतंगराव कदम याचे भारती विद्यापीठातले सहकारी. शिक्षण संस्थेचं साम्राज्य कसं स्थापन करायचं याचं बाळकडु त्यांनी पतंगराव कदम यांच्याकडून घेत सिंहगड संस्था स्थापन केली. आता मात्र ते पतंगराव कदम यांनाच आपला शत्रू मानत आहे. लोणावळ्याच्या जमीन प्रकरणात हेमंत पाटील यांना पुढे करुन पतंगराव कदमच आपल्या संस्थेला बदनाम करायचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नवले यांनी केला आहे.वनखात्याने या संस्थेला वारंवार नोटीस बजावल्या आहेत. पण वनजमिनीचा मुद्दा असल्याने त्यात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टानं यापूर्वीच नकार दिल्याचा दावा करत नवले यांनी वनखातं आणि पतंगराव कदम यांच्या विरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये कोर्ट काय निर्णय घेतंय यावरच या संस्थेचं भवितव्य ठरणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 22, 2011 04:39 PM IST

सिंहगड इन्सिट्युटच्या वादातून माजी गुरू-शिष्यांमध्ये जुंपली

प्राची कुलकर्णी, पुणे

22 फेब्रुवारी

लोणावळा इथली सिंहगड इन्स्टिट्युटची जमीन ही वनखात्याची आहे. तिथे झालेलं बांधकाम पाडुन टाकावं असे आदेश कोर्टाने दिले आहेत. मात्र अजुनही सरकार यावर काहीही कारवाई का करत नाही असा प्रश्न भ्रष्टाचार विरोधी मंचाचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे. मात्र वनमंत्री पतंगराव कदम हे आमच्या संस्थेला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारची कारस्थान करत असल्याचा थेट आरोप सिंहगड इन्सिट्युटचे अध्यक्ष एम.एन. नवले यांनी केला आहे.

पुण्यातल्या लोणावळा येथील सिंहगड इन्सिट्युटची शाखेची जमीन वनखात्याच्या अख्यत्यारित असल्याचं लक्षात आल्यानंतर वनविभागाने कोर्टामध्ये सिंहगड संस्थेच्या विरोधात याचिका दाखल केली. या याचिकेवर निर्णय देताना हायकोर्टाने ही जमीन वनखात्याची असल्याचं मान्य के लं असल्याची माहिती भ्रष्टाचार विरोधी मंचाचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी माहितीच्या अधिकारात मिळवली आहे.

सिंहगड संस्था उभी करणारे नवले हे पतंगराव कदम याचे भारती विद्यापीठातले सहकारी. शिक्षण संस्थेचं साम्राज्य कसं स्थापन करायचं याचं बाळकडु त्यांनी पतंगराव कदम यांच्याकडून घेत सिंहगड संस्था स्थापन केली. आता मात्र ते पतंगराव कदम यांनाच आपला शत्रू मानत आहे. लोणावळ्याच्या जमीन प्रकरणात हेमंत पाटील यांना पुढे करुन पतंगराव कदमच आपल्या संस्थेला बदनाम करायचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नवले यांनी केला आहे.

वनखात्याने या संस्थेला वारंवार नोटीस बजावल्या आहेत. पण वनजमिनीचा मुद्दा असल्याने त्यात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टानं यापूर्वीच नकार दिल्याचा दावा करत नवले यांनी वनखातं आणि पतंगराव कदम यांच्या विरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये कोर्ट काय निर्णय घेतंय यावरच या संस्थेचं भवितव्य ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 22, 2011 04:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close