S M L

मसापच्या पंचवार्षिक निवडणुकीत गैरप्रकाराची तक्रार

22 फेब्रुवारीमहाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत आता रंग भरू लागली आहे. 14 फेब्रुवारीला पोस्टानं मतपत्रिका रवाना करण्यात आल्या आहेत. 14 मार्चपर्यंत मतदारांकडून मतपत्रिका पुण्यातील साहित्य परिषदेकडे पोहचणं आवश्यक आहे. या निवडणुकीत काही उमेदवार गैरप्रकार करत असल्याच्या तक्रारी निर्वाचन मंडळाकडे आल्या आहेत. त्यामुळे निर्वाचन मंडळाच्या अध्यक्षा मेधा सिधये यांनी पत्रकार परिषद घेऊन आचारसंहितेचं पालन करण्याचे आवाहन केलं आहे. उमेदवारांनी मतदारांकडून मतपत्रिका गोळा करू नये, त्यांच्यावर कोणतीही सक्ती करू नये, कोणत्याही पोस्ट ऑफिसच्या पोस्टमनशी संपर्क साधू नये, मतदारांना प्रलोभने दाखवू नये मतपत्रिका फाडून टाकू नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत. या निवडणुकीत वि.भा.देशपांडे आणि माधवी वैद्य यांच्या नेतृत्वाखालील 2 पॅनल्स रिंगणात आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 22, 2011 08:12 AM IST

मसापच्या पंचवार्षिक निवडणुकीत गैरप्रकाराची तक्रार

22 फेब्रुवारी

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत आता रंग भरू लागली आहे. 14 फेब्रुवारीला पोस्टानं मतपत्रिका रवाना करण्यात आल्या आहेत. 14 मार्चपर्यंत मतदारांकडून मतपत्रिका पुण्यातील साहित्य परिषदेकडे पोहचणं आवश्यक आहे. या निवडणुकीत काही उमेदवार गैरप्रकार करत असल्याच्या तक्रारी निर्वाचन मंडळाकडे आल्या आहेत. त्यामुळे निर्वाचन मंडळाच्या अध्यक्षा मेधा सिधये यांनी पत्रकार परिषद घेऊन आचारसंहितेचं पालन करण्याचे आवाहन केलं आहे. उमेदवारांनी मतदारांकडून मतपत्रिका गोळा करू नये, त्यांच्यावर कोणतीही सक्ती करू नये, कोणत्याही पोस्ट ऑफिसच्या पोस्टमनशी संपर्क साधू नये, मतदारांना प्रलोभने दाखवू नये मतपत्रिका फाडून टाकू नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत. या निवडणुकीत वि.भा.देशपांडे आणि माधवी वैद्य यांच्या नेतृत्वाखालील 2 पॅनल्स रिंगणात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 22, 2011 08:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close