S M L

शेतकर्‍याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे

23 फेब्रुवारीजळगाव जिल्ह्यातल्या यावल भागात डीवायएसपीच्या मारहाणी एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला होता. त्याप्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत. त्याचबरोबर सुरेश चौधरीच्या एका पुतण्याला येत्या 24 तासात ग्रामीण हॉस्पिटलमध्ये नोकरी देण्यात येईल अशी घोषणाही गुलाबराव देवकर यांनी केली. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना एक शिष्टमंडळ भेटणार आहे आणि सुरेश चौधरीच्या कुटुंबीयांना 25 लाखाची मदत करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांना पाठवणार असल्याचंही त्यांनी सांगितले आहे. सुरेश चौधरी याच्या पोस्टमॉर्टेमचा गोपनीय अहवाल कोर्टात सादर करण्यात येणार आहे. या अहवालात सुरेश चौधरी याच्या अंगावर जखमेची एकही खूण नसल्याचं म्हटले आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय याबाबतचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असंही सूत्रांनी सांगितले.काल मंगळवारी राज्यभरात बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या. यावल तालुक्यातल्या कॉपी करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचा पहारा होता. सुरेश चौधरी हा स्थानिक शेतकरी शाळेजवळ असलेल्या आपल्या शेताजवळ उभा होता. पण तो कॉपी पुरवण्यासाठी शाळेजवळ आल्याचा संशय डीवायएसपी दिलीप शंकरवार यांना आला. या संशयावरुन त्यांनी चौधरी यांना बेदम मारहाण केली. यात चौधरी यांचा मृत्यू झाला. डीवायएसपी दिलीप शंकरवार यांना अटक करण्यात आली आहे. यावल पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान संतप्त जमावाने यावल पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयावर तुफान दगडफेक केली. यात पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष आलवे, पोलीस कॉन्स्टेबल कालिदास गायकवाड जमावाच्या दगडफेकीत जखमी झाले. पोलिसांच्या चार गाड्या आणि तहसीलदारांच्या सरकारी गाडीचं नुकसान झालं आहे. यावलचे माजी नगराध्यक्ष दिपक बेहेडे यांची गाडीदेखील संतप्त जमावानं पेटवली. यावल बाजारपेठही बंद आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 23, 2011 09:43 AM IST

शेतकर्‍याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे

23 फेब्रुवारी

जळगाव जिल्ह्यातल्या यावल भागात डीवायएसपीच्या मारहाणी एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला होता. त्याप्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत. त्याचबरोबर सुरेश चौधरीच्या एका पुतण्याला येत्या 24 तासात ग्रामीण हॉस्पिटलमध्ये नोकरी देण्यात येईल अशी घोषणाही गुलाबराव देवकर यांनी केली. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना एक शिष्टमंडळ भेटणार आहे आणि सुरेश चौधरीच्या कुटुंबीयांना 25 लाखाची मदत करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांना पाठवणार असल्याचंही त्यांनी सांगितले आहे. सुरेश चौधरी याच्या पोस्टमॉर्टेमचा गोपनीय अहवाल कोर्टात सादर करण्यात येणार आहे. या अहवालात सुरेश चौधरी याच्या अंगावर जखमेची एकही खूण नसल्याचं म्हटले आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय याबाबतचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असंही सूत्रांनी सांगितले.

काल मंगळवारी राज्यभरात बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या. यावल तालुक्यातल्या कॉपी करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचा पहारा होता. सुरेश चौधरी हा स्थानिक शेतकरी शाळेजवळ असलेल्या आपल्या शेताजवळ उभा होता. पण तो कॉपी पुरवण्यासाठी शाळेजवळ आल्याचा संशय डीवायएसपी दिलीप शंकरवार यांना आला. या संशयावरुन त्यांनी चौधरी यांना बेदम मारहाण केली. यात चौधरी यांचा मृत्यू झाला. डीवायएसपी दिलीप शंकरवार यांना अटक करण्यात आली आहे. यावल पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान संतप्त जमावाने यावल पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयावर तुफान दगडफेक केली. यात पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष आलवे, पोलीस कॉन्स्टेबल कालिदास गायकवाड जमावाच्या दगडफेकीत जखमी झाले. पोलिसांच्या चार गाड्या आणि तहसीलदारांच्या सरकारी गाडीचं नुकसान झालं आहे. यावलचे माजी नगराध्यक्ष दिपक बेहेडे यांची गाडीदेखील संतप्त जमावानं पेटवली. यावल बाजारपेठही बंद आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2011 09:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close