S M L

बेकायदेशीर होर्डिंग्ज लावणार्‍यांवर खटले भरा !

23 फेब्रुवारीचौकाचौकांमध्ये आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसांच्या शुभेच्छांचे किंवा अभिनंदनाची होर्डिंग्ज लावणार्‍या राजकीय नेत्यांना हायकोर्टाने चांगलाच दणका दिला. यापुढे परवानगी न घेता असे होर्डिंग्ज लावणार्‍यांवर यापुढे कारवाई होणार आहे. अशा उत्साही कार्यकर्त्यांवर यापुढे खटला भरण्यात येणार आहे. मुंबई हायकोर्टाने काल मंगळवारी हा निर्णय दिला. असे बेकायदेशीर होर्डिंग्ज लावणारे सत्ताधारी पक्षातले असोत किंवा विरोधी, त्यांच्यावर खटला भरण्यात येईल असं न्यायमूर्ती पी.बी. मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखालील बेंचनं स्पष्ट केले. जनहित मंच या स्वयंसेवी संघटनेनं दाखल केलेल्या जनहित याचिकेवर ही सुनावणी झाली. औरंगाबाद खंडपीठानंही या होर्डिंग्जबाबत काही सूचना केल्या होत्या. महानगरपालिकेच्या लायसन्स ऑथोरिटीकडून केवळ 241 बॅनर्सना परवानगी देण्यात आली होती. गेल्या वर्षभरात बीएमसीनं 1 लाख 24 हजार 408 बेकायदेशीर होर्डिंग्ज आणि बॅनर्स हटवले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 23, 2011 05:25 PM IST

बेकायदेशीर होर्डिंग्ज लावणार्‍यांवर खटले भरा !

23 फेब्रुवारी

चौकाचौकांमध्ये आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसांच्या शुभेच्छांचे किंवा अभिनंदनाची होर्डिंग्ज लावणार्‍या राजकीय नेत्यांना हायकोर्टाने चांगलाच दणका दिला. यापुढे परवानगी न घेता असे होर्डिंग्ज लावणार्‍यांवर यापुढे कारवाई होणार आहे. अशा उत्साही कार्यकर्त्यांवर यापुढे खटला भरण्यात येणार आहे. मुंबई हायकोर्टाने काल मंगळवारी हा निर्णय दिला. असे बेकायदेशीर होर्डिंग्ज लावणारे सत्ताधारी पक्षातले असोत किंवा विरोधी, त्यांच्यावर खटला भरण्यात येईल असं न्यायमूर्ती पी.बी. मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखालील बेंचनं स्पष्ट केले. जनहित मंच या स्वयंसेवी संघटनेनं दाखल केलेल्या जनहित याचिकेवर ही सुनावणी झाली. औरंगाबाद खंडपीठानंही या होर्डिंग्जबाबत काही सूचना केल्या होत्या. महानगरपालिकेच्या लायसन्स ऑथोरिटीकडून केवळ 241 बॅनर्सना परवानगी देण्यात आली होती. गेल्या वर्षभरात बीएमसीनं 1 लाख 24 हजार 408 बेकायदेशीर होर्डिंग्ज आणि बॅनर्स हटवले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2011 05:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close