S M L

पुण्यात हव्या आणखी लोकल गाड्या !

23 फेब्रुवारीदेशातील सातवे मेट्रो शहर असणार्‍या आणि वेगाने विकसित होत असलेल्या पुण्याकडे रेल्वेनं मात्र आत्तापर्यंत दुर्लक्षच केलं आहे. पुणे रेल्वे स्टेशनचा दर्जा सुधारणं असो वा पुण्यातून लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या सुरू करणं असो प्रवाशांच्या मागण्यांकडे कानाडोळाच केल्याचं जाणवतं. यंदा तरी ममता बॅनर्जी पुण्याचा हा रेल्वेबाबतचा बॅकलॉग भरून काढतील अशी अपेक्षा आहे.पुणे लोणावळा लोकल गाड्यांची संख्या वाढवण्याबरोबर पुणे- दौंड मार्गाचं रखडलेलं विद्युतीकरण करून या मार्गावरही लोकल गाड्या सुरू कराव्यात ही पुणे शहर आणि परिसरातील प्रवाशांची आग्रही मागणी आहे ज्याकडे दुर्लक्षच करण्यात आलं आहे. मागच्या अंदाजपत्रकात जाहीर जालेल्या पुणे- हावडा दुरांतो आणि पुणे एर्नाकुलम सुपरफास्ट गाड्या सुरू झाल्या पण या गाड्यांच्या वेळा आणि मार्गावरचे थांबे पाहता बाहेरील राज्यातील प्रवाशांच्याच त्या सोयीच्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय प्रगती एक्सप्रेसनंतर मुंबईला जाण्याकरता सकाळी गाडी नाही हे लक्षात घेऊन सकाळी 8 ते दुपारी 3 या वेळात पुणे- मुंबई मार्गावर नव्या गाड्या सुरू कराव्यात तसेच पुणे-पनवेल, पुणे-वसई गाड्यांचीही मागणी आहे. एकूणच ममता बॅनजीर्ंच्या रेल्वे बजेटकडून पुणेकरांच्या भरपूर अपेक्षा आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 23, 2011 05:16 PM IST

पुण्यात हव्या आणखी लोकल गाड्या !

23 फेब्रुवारी

देशातील सातवे मेट्रो शहर असणार्‍या आणि वेगाने विकसित होत असलेल्या पुण्याकडे रेल्वेनं मात्र आत्तापर्यंत दुर्लक्षच केलं आहे. पुणे रेल्वे स्टेशनचा दर्जा सुधारणं असो वा पुण्यातून लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या सुरू करणं असो प्रवाशांच्या मागण्यांकडे कानाडोळाच केल्याचं जाणवतं. यंदा तरी ममता बॅनर्जी पुण्याचा हा रेल्वेबाबतचा बॅकलॉग भरून काढतील अशी अपेक्षा आहे.

पुणे लोणावळा लोकल गाड्यांची संख्या वाढवण्याबरोबर पुणे- दौंड मार्गाचं रखडलेलं विद्युतीकरण करून या मार्गावरही लोकल गाड्या सुरू कराव्यात ही पुणे शहर आणि परिसरातील प्रवाशांची आग्रही मागणी आहे ज्याकडे दुर्लक्षच करण्यात आलं आहे. मागच्या अंदाजपत्रकात जाहीर जालेल्या पुणे- हावडा दुरांतो आणि पुणे एर्नाकुलम सुपरफास्ट गाड्या सुरू झाल्या पण या गाड्यांच्या वेळा आणि मार्गावरचे थांबे पाहता बाहेरील राज्यातील प्रवाशांच्याच त्या सोयीच्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याशिवाय प्रगती एक्सप्रेसनंतर मुंबईला जाण्याकरता सकाळी गाडी नाही हे लक्षात घेऊन सकाळी 8 ते दुपारी 3 या वेळात पुणे- मुंबई मार्गावर नव्या गाड्या सुरू कराव्यात तसेच पुणे-पनवेल, पुणे-वसई गाड्यांचीही मागणी आहे. एकूणच ममता बॅनजीर्ंच्या रेल्वे बजेटकडून पुणेकरांच्या भरपूर अपेक्षा आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2011 05:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close