S M L

कोल्हापूर - कोकण रेल्वेला जोडण्याची मागणी

प्रताप नाईक, कोल्हापूर24 फेब्रुवारीउत्तर भारत आणि कोकणाला जोडणारा दुवा म्हणून कोल्हापूरकडे पाहिलं जातं. त्यामुळे कोल्हापूर रेल्वे स्थानक कोकण रेल्वेला जोडावं अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहेत. पण केंद्रीय रेल्वे बजेटमध्ये नेहमी या मागणीकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे किमान या रेल्वे बजेटमध्येतरी कोल्हापूर - कोकण रेल्वेला जोडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळते का ते पाहावी लागेल आहे.महाराष्ट्र रेल्वे आणि रोड पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णाराव सोळंखी यांनी गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूर शहर कोकण रेल्वेला जोडावं यासाठी पाठपुरावा करत आहेत. पण असंख्य कोल्हापूरकरांच्या पाठपुरावाच्या रेट्यानंतरही या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही.कोकण रेल्वेला कोल्हापूर जोडलं तर कोकणातले मासे,आंबे थेट उत्तर भारतात पाठवता येतील. तर पश्चिम महाराष्ट्रातली साखर, गूळ आणि भाजीपाला यासारखी उत्पादनं कोकणातल्या बंदरामार्फेत कमी खर्चात विदेशात पाठवता येणं शक्य होईल. एवढंच नाही तर पर्यटन विकासालाही चालना मिळेल. सध्या कोल्हापूर - मुंबई व्हाया मिरज-पुणे ह्या मार्गाचं अंतर 518 किलोमीटर्स आहे. पण वारणानगर-मलकापूर-रत्नागिरी - मुंबई या नवीन प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर हेच अंतर 480 किलोमीटर्स होईल. त्यामुळे सादर होणार्‍या रेल्वे बजेटमध्ये ह्या नवीन मार्गाला आतातरी मंजुरी मिळेल का याकडे कोल्हापूरकरांचं लक्ष असेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 24, 2011 02:26 PM IST

कोल्हापूर - कोकण रेल्वेला जोडण्याची मागणी

प्रताप नाईक, कोल्हापूर

24 फेब्रुवारी

उत्तर भारत आणि कोकणाला जोडणारा दुवा म्हणून कोल्हापूरकडे पाहिलं जातं. त्यामुळे कोल्हापूर रेल्वे स्थानक कोकण रेल्वेला जोडावं अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहेत. पण केंद्रीय रेल्वे बजेटमध्ये नेहमी या मागणीकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे किमान या रेल्वे बजेटमध्येतरी कोल्हापूर - कोकण रेल्वेला जोडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळते का ते पाहावी लागेल आहे.

महाराष्ट्र रेल्वे आणि रोड पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णाराव सोळंखी यांनी गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूर शहर कोकण रेल्वेला जोडावं यासाठी पाठपुरावा करत आहेत. पण असंख्य कोल्हापूरकरांच्या पाठपुरावाच्या रेट्यानंतरही या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही.

कोकण रेल्वेला कोल्हापूर जोडलं तर कोकणातले मासे,आंबे थेट उत्तर भारतात पाठवता येतील. तर पश्चिम महाराष्ट्रातली साखर, गूळ आणि भाजीपाला यासारखी उत्पादनं कोकणातल्या बंदरामार्फेत कमी खर्चात विदेशात पाठवता येणं शक्य होईल. एवढंच नाही तर पर्यटन विकासालाही चालना मिळेल. सध्या कोल्हापूर - मुंबई व्हाया मिरज-पुणे ह्या मार्गाचं अंतर 518 किलोमीटर्स आहे. पण वारणानगर-मलकापूर-रत्नागिरी - मुंबई या नवीन प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर हेच अंतर 480 किलोमीटर्स होईल. त्यामुळे सादर होणार्‍या रेल्वे बजेटमध्ये ह्या नवीन मार्गाला आतातरी मंजुरी मिळेल का याकडे कोल्हापूरकरांचं लक्ष असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 24, 2011 02:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close