S M L

जैतापूर प्रकल्पग्रस्तांवर पोलिसांचा दबाव !

24 फेब्रुवारीसरकारने पाठवलेल्या काँग्रेसच्या समितीचा अहवाल आयबीएन लोकमतच्या हाती लागला आहे. या अहवालात सरकारच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम झालं आहे. जैतापूरच्या प्रश्नावर स्थानिक प्रकल्पग्रस्तांचं म्हणणं जाणून घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसनं सहा सदस्यीय समिती जैतापूर परिसरात पाठवली होती. या समितीच्या प्रकल्पासंदर्भातला अहवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गेल्या 6 जानेवारीला दिला. यामध्ये प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेण्याऐवजी पोलीस यंत्रणेचा वापर केला. त्यामुळे त्यावर उपाययोजना करणं आवश्यक आहे अशी महत्त्वाची शिफारस काँग्रेसच्या समितीनं मुख्यमंत्र्यांना केली.तसेच समितीनं यामध्ये दोन महत्त्वाची निरीक्षणं नोंदवलेली आहेत. प्रवीण गवाणकर यांनी आंदोलन केलं म्हणून त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलावर खोट्या नाट्या फिर्यादी दाखल केल्या आहेत. शफरुद्दीन शेख यांच्या पुतण्याला पोलिसांनी जाणीवपूर्वक अपघात घडवून ठार केलं त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. तसेच शेख यांच्या मुलावर पोलिसांनी केसेस दाखल केल्या आहेत. ही निरीक्षणं नोंदवताना प्रकल्पग्रस्तांवर पोलिसी बळजबरी झाल्याचं स्पष्ट मत समितीनं नोंदवलं आहे. शिवाय एक लाख कोटी रुपयांचा हा प्रकल्प असतानाही प्रकल्पग्रस्तांना अवघे 15 कोटी रुपये देणे हे संयुक्तीक वाटत नाही. याखेरीज प्रकल्पग्रस्त मच्छिमारांचा काहीच विचार केला नसल्याचं निरीक्षणही नोंदवून समितीनं प्रकल्पग्रस्तांचं पॅकेज वाढवून देण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांना केलेली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 24, 2011 04:16 PM IST

जैतापूर प्रकल्पग्रस्तांवर पोलिसांचा दबाव !

24 फेब्रुवारी

सरकारने पाठवलेल्या काँग्रेसच्या समितीचा अहवाल आयबीएन लोकमतच्या हाती लागला आहे. या अहवालात सरकारच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम झालं आहे. जैतापूरच्या प्रश्नावर स्थानिक प्रकल्पग्रस्तांचं म्हणणं जाणून घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसनं सहा सदस्यीय समिती जैतापूर परिसरात पाठवली होती. या समितीच्या प्रकल्पासंदर्भातला अहवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गेल्या 6 जानेवारीला दिला. यामध्ये प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेण्याऐवजी पोलीस यंत्रणेचा वापर केला. त्यामुळे त्यावर उपाययोजना करणं आवश्यक आहे अशी महत्त्वाची शिफारस काँग्रेसच्या समितीनं मुख्यमंत्र्यांना केली.

तसेच समितीनं यामध्ये दोन महत्त्वाची निरीक्षणं नोंदवलेली आहेत. प्रवीण गवाणकर यांनी आंदोलन केलं म्हणून त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलावर खोट्या नाट्या फिर्यादी दाखल केल्या आहेत. शफरुद्दीन शेख यांच्या पुतण्याला पोलिसांनी जाणीवपूर्वक अपघात घडवून ठार केलं त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. तसेच शेख यांच्या मुलावर पोलिसांनी केसेस दाखल केल्या आहेत. ही निरीक्षणं नोंदवताना प्रकल्पग्रस्तांवर पोलिसी बळजबरी झाल्याचं स्पष्ट मत समितीनं नोंदवलं आहे. शिवाय एक लाख कोटी रुपयांचा हा प्रकल्प असतानाही प्रकल्पग्रस्तांना अवघे 15 कोटी रुपये देणे हे संयुक्तीक वाटत नाही. याखेरीज प्रकल्पग्रस्त मच्छिमारांचा काहीच विचार केला नसल्याचं निरीक्षणही नोंदवून समितीनं प्रकल्पग्रस्तांचं पॅकेज वाढवून देण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांना केलेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 24, 2011 04:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close