S M L

लिबियात रक्तपात ; भारतीयांना आणण्यास विमान रवाना

25 फेब्रुवारीइजिप्तमध्ये सत्तापालट शांततेत झाला असला तरी लिबियात मात्र रक्तपाताला सुरवात झाली. राजधानी ट्रायपोलीमध्ये सरकारविरोधी निदर्शकांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात येत आहे. लष्करशाह गद्दाफींचे समर्थक हा गोळीबार करत आहे. राजधानीहून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या झवियाह शहरात एका मशीदीत थांबलेल्या निदर्शकांवर गद्दाफी समर्थकांनी हल्ला केला. अत्याधुनिक शस्त्रांचा वापर केल्यामुळे शंभराच्या वर निदर्शक काही क्षणांत ठार झाले. पण दुसरीकडे गद्दाफींचं देशावरचे नियंत्रण सुटत चालले आहे. बेंगाझी नावाचे लिबियातले दुसरे सगळ्यात मोठ शहर आता निदर्शकांनी ताब्यात घेतलं आहे. हिंसाचाराने होरपळलेल्या या देशात अठरा हजार भारतीय अडकले आहेत. त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाची विशेष विमान आणि एक विशेष जहाज पाठवण्यात आले आहेत. पुढच्या दोन आठवड्यांत सर्व भारतीयांना लिबियातून बाहेर काढण्याचे प्रयत्न नवी दिल्लीतून सुरू आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 25, 2011 05:22 PM IST

लिबियात रक्तपात ; भारतीयांना आणण्यास विमान रवाना

25 फेब्रुवारी

इजिप्तमध्ये सत्तापालट शांततेत झाला असला तरी लिबियात मात्र रक्तपाताला सुरवात झाली. राजधानी ट्रायपोलीमध्ये सरकारविरोधी निदर्शकांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात येत आहे. लष्करशाह गद्दाफींचे समर्थक हा गोळीबार करत आहे. राजधानीहून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या झवियाह शहरात एका मशीदीत थांबलेल्या निदर्शकांवर गद्दाफी समर्थकांनी हल्ला केला. अत्याधुनिक शस्त्रांचा वापर केल्यामुळे शंभराच्या वर निदर्शक काही क्षणांत ठार झाले. पण दुसरीकडे गद्दाफींचं देशावरचे नियंत्रण सुटत चालले आहे. बेंगाझी नावाचे लिबियातले दुसरे सगळ्यात मोठ शहर आता निदर्शकांनी ताब्यात घेतलं आहे. हिंसाचाराने होरपळलेल्या या देशात अठरा हजार भारतीय अडकले आहेत. त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाची विशेष विमान आणि एक विशेष जहाज पाठवण्यात आले आहेत. पुढच्या दोन आठवड्यांत सर्व भारतीयांना लिबियातून बाहेर काढण्याचे प्रयत्न नवी दिल्लीतून सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 25, 2011 05:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close