S M L

आमदार दिलीप वाघ निलंबित

26 फेब्रुवारीजळगाव जिल्ह्यातील पाचोर्‍याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप वाघ यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलं आहे. त्यांच्या विरोधात नाशिकमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी ही कारवाई केली. तसेच याप्रकरणाची नि:पक्ष चौकशी करण्याचं आवाहन राष्ट्रवादीनं राज्य सरकारला केलं. 21 फेब्रुवारीला आमदार वाघ आणि त्यांचे सहकारी महेश माळी नाशिकच्या विश्रामगृहावर आले होते. तेंव्हा आचारसंहिता चालू असताना त्यांनी विश्रामगृहाचा गैरवापर केल्याचही पुढे आले आहे. सिंहगड विश्रामगृहात त्यांनी स्वत:साठी एक रुम, तर प्रतापगडमध्ये बॉडीगार्डसाठी एक रुम जबरदस्तीनं बूक करवून घेतली. दरम्यान, नोकरीचं आमिष दाखवून त्यादिवशी आमदारांनी अतिप्रसंग केल्याची तक्रार एका महिलेने सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. सीआयडी चौकशी करावी - खडसेआमदार वाघ बलात्कार प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंनी केली. पर्याय नसल्यानेच राष्ट्रवादीनं दिलीप वाघ यांचं निलंबन केलं असंही खडसेंनी म्हटलं आहे. सरकारी गेस्ट हाऊसचा गैरवापर केल्याने वाघ यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग प्रकरणाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही खडसेंनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 26, 2011 09:50 AM IST

आमदार दिलीप वाघ निलंबित

26 फेब्रुवारीजळगाव जिल्ह्यातील पाचोर्‍याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप वाघ यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलं आहे. त्यांच्या विरोधात नाशिकमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी ही कारवाई केली. तसेच याप्रकरणाची नि:पक्ष चौकशी करण्याचं आवाहन राष्ट्रवादीनं राज्य सरकारला केलं. 21 फेब्रुवारीला आमदार वाघ आणि त्यांचे सहकारी महेश माळी नाशिकच्या विश्रामगृहावर आले होते. तेंव्हा आचारसंहिता चालू असताना त्यांनी विश्रामगृहाचा गैरवापर केल्याचही पुढे आले आहे. सिंहगड विश्रामगृहात त्यांनी स्वत:साठी एक रुम, तर प्रतापगडमध्ये बॉडीगार्डसाठी एक रुम जबरदस्तीनं बूक करवून घेतली. दरम्यान, नोकरीचं आमिष दाखवून त्यादिवशी आमदारांनी अतिप्रसंग केल्याची तक्रार एका महिलेने सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.

सीआयडी चौकशी करावी - खडसे

आमदार वाघ बलात्कार प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंनी केली. पर्याय नसल्यानेच राष्ट्रवादीनं दिलीप वाघ यांचं निलंबन केलं असंही खडसेंनी म्हटलं आहे. सरकारी गेस्ट हाऊसचा गैरवापर केल्याने वाघ यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग प्रकरणाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही खडसेंनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 26, 2011 09:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close