S M L

कॉलेजने केली भारनियमनावर मात !

26 फेब्रुवारीविजेच्या समस्येतून राज्य मुक्त होईल तेव्हा होईल मात्र अहमदनगर जिल्ह्यातील एक कॉलेज मात्र स्वयंप्रकाशित झालं आहे. या कॉलेज मध्ये दोन पवनचक्या उभारल्यामुळे विजेच्या भारनियमनापासून कायमची मुक्ती मिळवली. राज्यात सगळीकडे सध्या भारनियमन सुरु आहे. त्यात ग्रामीण भागात तर परिस्थिती फारच वाईट आहे. यावर मात करण्यासाठी अकोले तालुक्यातील राजूरच्या मनोहरराव कॉलेजने आपल्या छतावर 3.5 मेगावॅटच्या दोन पवनचक्या आणि 1.5 मेगावॅट चे सोलर पॅनल उभारले आहे. त्यापासून निर्माण झालेली ऊर्जा 220 ऍम्पिअरच्या 20 बॅटर्‍यामध्ये साठवली जाते. ही वीज कॉलेजच्या प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय, विद्यार्थी वसतीगृह सह सगळीकडे पुरवण्यात येते. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून 12 लाख रुपये तर पुणे विद्यापीठातून 7 लाख रुपये अनुदान मिळालं आहे. त्या मध्ये फक्त 1 लाख रूपयांची कॉलेजने गुंतवणूक करून फक्त 20 लाख रूपयात पुण्याच्या युनीट्रॉन कंपनीच्या मदतीने उभारण्यात आला आहे. अशाप्रकारचा प्रकल्प उभारणारं हे कॉलेज देशातलं पहिलेच कॉलेजआहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 40 किलोवॅट वीज निर्मिती होते. त्यामुळे हे कॉलेज स्वयं प्रकाशित झालं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 26, 2011 03:16 PM IST

कॉलेजने केली भारनियमनावर मात !

26 फेब्रुवारी

विजेच्या समस्येतून राज्य मुक्त होईल तेव्हा होईल मात्र अहमदनगर जिल्ह्यातील एक कॉलेज मात्र स्वयंप्रकाशित झालं आहे. या कॉलेज मध्ये दोन पवनचक्या उभारल्यामुळे विजेच्या भारनियमनापासून कायमची मुक्ती मिळवली.

राज्यात सगळीकडे सध्या भारनियमन सुरु आहे. त्यात ग्रामीण भागात तर परिस्थिती फारच वाईट आहे. यावर मात करण्यासाठी अकोले तालुक्यातील राजूरच्या मनोहरराव कॉलेजने आपल्या छतावर 3.5 मेगावॅटच्या दोन पवनचक्या आणि 1.5 मेगावॅट चे सोलर पॅनल उभारले आहे. त्यापासून निर्माण झालेली ऊर्जा 220 ऍम्पिअरच्या 20 बॅटर्‍यामध्ये साठवली जाते. ही वीज कॉलेजच्या प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय, विद्यार्थी वसतीगृह सह सगळीकडे पुरवण्यात येते.

या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून 12 लाख रुपये तर पुणे विद्यापीठातून 7 लाख रुपये अनुदान मिळालं आहे. त्या मध्ये फक्त 1 लाख रूपयांची कॉलेजने गुंतवणूक करून फक्त 20 लाख रूपयात पुण्याच्या युनीट्रॉन कंपनीच्या मदतीने उभारण्यात आला आहे.

अशाप्रकारचा प्रकल्प उभारणारं हे कॉलेज देशातलं पहिलेच कॉलेजआहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 40 किलोवॅट वीज निर्मिती होते. त्यामुळे हे कॉलेज स्वयं प्रकाशित झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 26, 2011 03:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close