S M L

पुण्यातील सायक्लोथॉन स्पर्धेत सतबीर सिंगची बाजी

27 फेब्रुवारीपुण्यात आज सायक्लोथॉनचा थरार पहायला मिळाला. पन्नास किलोमीटरची व्यावसायिक सायकलिंग स्पर्धा आणि हौशी सायकलिंग बरोबरच कॉर्पोरेट आणि ज्युनिअर गटात ही स्पर्धा पार पडली. व्यावसायिक गटात सतबीर सिंगने ही स्पर्धा जिंकली. तर गतविजेता अमनदीप सिंग दुसरा आला. सकाळी सहा वाजता खडकीतल्या एएफके फुटबॉल स्टेडियममधून मुख्य स्पर्धेला सुरुवात झाली. क्रिकेटर प्रवीण आमरे यांनी स्पर्धेचं उद्घाटन केलं. सायकलिंग करा, फिट रहा असा संदेश ही सायक्लथॉन देत होती. त्याचबरोबर इंधन बचत आणि पर्यावरण रक्षण हा स्पर्धेचा नारा होता. हिरो सायकलनं ही सायक्लोथॉन पुरस्कृत केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 27, 2011 10:04 AM IST

पुण्यातील सायक्लोथॉन स्पर्धेत सतबीर सिंगची बाजी

27 फेब्रुवारी

पुण्यात आज सायक्लोथॉनचा थरार पहायला मिळाला. पन्नास किलोमीटरची व्यावसायिक सायकलिंग स्पर्धा आणि हौशी सायकलिंग बरोबरच कॉर्पोरेट आणि ज्युनिअर गटात ही स्पर्धा पार पडली. व्यावसायिक गटात सतबीर सिंगने ही स्पर्धा जिंकली. तर गतविजेता अमनदीप सिंग दुसरा आला. सकाळी सहा वाजता खडकीतल्या एएफके फुटबॉल स्टेडियममधून मुख्य स्पर्धेला सुरुवात झाली. क्रिकेटर प्रवीण आमरे यांनी स्पर्धेचं उद्घाटन केलं. सायकलिंग करा, फिट रहा असा संदेश ही सायक्लथॉन देत होती. त्याचबरोबर इंधन बचत आणि पर्यावरण रक्षण हा स्पर्धेचा नारा होता. हिरो सायकलनं ही सायक्लोथॉन पुरस्कृत केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 27, 2011 10:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close