S M L

महिलांना 50 टक्के आरक्षणची राष्ट्रवादीची भूमिका

27 फेब्रुवारीराज्यात पुढील वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होत आहे. यात महिलांना जास्तीत जास्त सक्रिय करण्याच्य उद्देशान या संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर केली आहे. 1994 साली राज्यात महिलाधोरण लागू केल्यानंतर आता शरद पवार यांनी महिलांना हे जादा आरक्षण देण्याची महत्त्वाची सूचना केली. त्यानुसार राष्ट्रावादी काँग्रेसकडे असलेलं गा्रमविकास खातं, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांसाठी महिलांना 50 टक्के आरक्षणाचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर मांडणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना नगरविकास खात्याच्या माध्यमातून नगरपालिका आणि महापालिकांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षणाचा प्रस्ताव मांडण्याची विनंती केली जाणार आहे.अशा प्रकारे मंत्रिमंडळाच्या माध्यमातून निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये केली जाईल हे जवळजवळ स्पष्ट झालं आहे. आज शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा गेल्या 3 महिन्यातला लेखाजोखा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान महिलांना सर्वच क्षेत्रात 50 टक्के आरक्षण द्यावं अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 27, 2011 12:08 PM IST

महिलांना 50 टक्के आरक्षणची राष्ट्रवादीची भूमिका

27 फेब्रुवारी

राज्यात पुढील वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होत आहे. यात महिलांना जास्तीत जास्त सक्रिय करण्याच्य उद्देशान या संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर केली आहे. 1994 साली राज्यात महिलाधोरण लागू केल्यानंतर आता शरद पवार यांनी महिलांना हे जादा आरक्षण देण्याची महत्त्वाची सूचना केली.

त्यानुसार राष्ट्रावादी काँग्रेसकडे असलेलं गा्रमविकास खातं, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांसाठी महिलांना 50 टक्के आरक्षणाचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर मांडणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना नगरविकास खात्याच्या माध्यमातून नगरपालिका आणि महापालिकांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षणाचा प्रस्ताव मांडण्याची विनंती केली जाणार आहे.

अशा प्रकारे मंत्रिमंडळाच्या माध्यमातून निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये केली जाईल हे जवळजवळ स्पष्ट झालं आहे. आज शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा गेल्या 3 महिन्यातला लेखाजोखा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

दरम्यान महिलांना सर्वच क्षेत्रात 50 टक्के आरक्षण द्यावं अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 27, 2011 12:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close