S M L

नांदेड स्फोटाच्या तपासात तपासयंत्रणांची हलगर्जी

6 नोव्हेंबर, मुंबईनांदेड बॉम्बस्फोटाच्या तपासानंतर संघपरिवाराचे काही लोक दहशतवादी कारवायात गुंतलेले आहेत याची माहिती महाराष्ट्राच्या गृहखात्याला जुलै 2006 मध्येच मिळाली होती. तर सीबीआयला 2007 सालापासून याची माहिती होती. असं असताना उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील आणि केद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी नांदेड बॉम्बस्फोट हा केवळ अपघात आहे असं मानलं. संघ परिवाराचा हात असल्याचा पोलिसांचा रिपोर्ट असताना त्याचा कसून तपास करण्यात यावा यासाठी आग्रह धरला नाही हे आता उघड होतंय. आयबीएन लोकमतच्या स्पेशल रिपोर्टमध्ये ही माहिती उघड झाली आहे.मालेगावातील 11 वर्षाची शबाना 29 सप्टेंबरला खेळायला म्हणून घराबाहेर गेली. पण घरात परत आली नाही. शबाना कदाचित वाचली असती महाराष्ट्र पोलिस आणि सीबीआयनं जर नांदेड बॉम्बस्फोटातील संघ परिवाराच्या कटाचा छडा लावला असता तर हे शक्य झालं असतं. आयबीएन लोकमतला मिळालेल्या पोलिसांच्या कागदपत्रावरुन हे स्पष्ट होतंय. पुण्यात सिंहगडाच्या पायथ्याशी बजरंग दलानं जे बॉम्ब बनवण्याचं ट्रेनिंग दिलं त्यात संजय चौधरी सहभागी होता. संजय चौधरी बरोबर मारुती वाघ, हिमांशू पानसे, योगेश देशपांडे, हे ही होते. त्यांना तीन प्रकारचे पाईप बॉम्ब बनवण्याचं ट्रेनिंग देण्यात आलं. यात पाईप बॉम्ब, सुतळी बॉम्ब आणि टायमर बॉम्बचा समावेश होता. हे चौघे जेव्हा ट्रेनिंग संपवून पुणे रेल्वे स्टेशनला आले तेव्हा त्यांना एक बॅग देण्यात आली त्यात बॉम्ब तयार करण्याचं साहित्य होतं. या ट्रेनिंगचा उपयोग ताबडतोब झाला. परभणी इथं बॉम्बस्फोट करण्यात आला. हा बॉम्ब फेकला होता हिमांशूनं. नंतर जालना इथं राहुल पांडे आणि हिमांशू पानसेनं बॉम्बस्फोट घडवून आणले. या सगळ्या प्रकारात योगेश देशपांडे हा नेता होता तर हिमांशू पानसे त्याचा उपनेता.संजय चौधरीनं नार्को अ‍ॅनालिसीस टेस्ट मध्ये भयानक खुलासा केलाय. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ' हिमांशू पानसे नेहमी मुंबईत बजरंग दलाचा नेता बालाजी पाखरे आणि आरएसएसच्या इतर वरिष्ठ नेत्यांशी मोबाईलवरुन बोलायचा. त्यांचा आदेश आल्याशिवाय तो कटाची अंमलबजावणी करत नसे. वरिष्ठ आरएसएस नेत्यांशी बोलण्यासाठी हिमांशूकडे वेगळं सिमकार्ड होतं. संजय चौधरीनं हे ही कबूल केलं त्यालाही एक सिमकार्ड देण्यात आलं होतं. त्यावरु न एकदा बजरंग दलाचा नेता बालाजी पाखरेनं फोन केला होता. घाबरू नकोस, जेलमधून लवकरच तुला सोडवतो असं पाखरेनं त्याला सांगितलं होतं.बजरंग दलाचा नेता पाखरेचा आत्मविश्वास अनाठायी नव्हता. मुंबई पोलिसांच्या एटीएसनं संघपरिवाराच्या दहशतवादी कटाचा छडा लावला. पण कट रचल्याबद्दल मोक्का कायदा लावला नाही. सीबीआयच्या ताब्यात तपास गेल्यानंतर तर कट रचणार्‍यांना अटकच झाली नाही. उलट ज्या लक्ष्मण राजकोंडावारला एटीएसनं प्रमुख आरोपी केलं, त्याला सीबीआयनं सोडून दिलं. हे सगळं झालं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवटीत. नांदेडचा बॉम्बस्फोट हा फटाक्यांचा स्फोट म्हणून सांगितला गेला. त्यामुळंच साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर हिनं कटाच्या पुढच्या भागाची अंमलबजावणी केली. सात जण ठार झाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 6, 2008 11:09 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2008 11:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close