S M L

होमलोन झाले स्वस्त !

28 फेब्रुवारीघर घेण्याची इच्छा असणार्‍या मध्यम वर्गीय ग्राहकाला अर्थमंत्री प्रणव मुखजीर्ंनी दिलासा दिला आहे. लाखांपर्यंतच्या कर्जांवर आता व्याजदरात एक टक्का सवलत मिळणार आहे. त्यामुळे नजीकच्या काळात 25 लाखांपर्यंत किंमत असणार्‍या घरांची संख्या आणि मागणी वाढेल. सोबतच 25 लाखांपर्यंतच्या होमलोनला आता प्रायोरिटी लोडिंगचा दर्जा देण्यात आल्यानेही लोन घेणार्‍यांची संख्या वाढेल. तर बांधकाम उद्योगाच्या दृष्टीने दिलासा देणारी गोष्ट म्हणजे सिमेंट तयार करण्यासाठी लागणार्‍या पेट कोक आणि जिप्सम या वस्तूंवरची कस्टम्स ड्युटी कमी करून अडीच टक्क्यांवर आणण्यात आली. याचा परिणाम सिमेंटच्या किंमतींवर पहायला मिळेल. स्टील उद्योगालाही या बजेटमुळे दिलासा मिळाला. कच्च्या पोलादाची देशाबाहेर होणारी निर्यात रोखण्यासाठी या लोहखनिजावरची ड्यूटी आता 20 टक्के करण्यात आली. यामुळे स्टीलच्या उत्पादनासाठी देशांतर्गत कच्चा माल जास्त उपलब्ध असेल. याचा परिणाम स्टीलच्या किंमती काही प्रमाणात कमी होण्यासाठी होईल. एकंदरीतच या सगळ्या घोषणांमुळे मोठ्या शहरांजवळच्या उपनगरांमध्ये आणि नाशिक, नागपूर, औरंगाबादसारख्या शहरांमध्ये झपाट्याने विस्तार होईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 28, 2011 05:23 PM IST

होमलोन झाले स्वस्त !

28 फेब्रुवारी

घर घेण्याची इच्छा असणार्‍या मध्यम वर्गीय ग्राहकाला अर्थमंत्री प्रणव मुखजीर्ंनी दिलासा दिला आहे. लाखांपर्यंतच्या कर्जांवर आता व्याजदरात एक टक्का सवलत मिळणार आहे. त्यामुळे नजीकच्या काळात 25 लाखांपर्यंत किंमत असणार्‍या घरांची संख्या आणि मागणी वाढेल. सोबतच 25 लाखांपर्यंतच्या होमलोनला आता प्रायोरिटी लोडिंगचा दर्जा देण्यात आल्यानेही लोन घेणार्‍यांची संख्या वाढेल. तर बांधकाम उद्योगाच्या दृष्टीने दिलासा देणारी गोष्ट म्हणजे सिमेंट तयार करण्यासाठी लागणार्‍या पेट कोक आणि जिप्सम या वस्तूंवरची कस्टम्स ड्युटी कमी करून अडीच टक्क्यांवर आणण्यात आली. याचा परिणाम सिमेंटच्या किंमतींवर पहायला मिळेल. स्टील उद्योगालाही या बजेटमुळे दिलासा मिळाला. कच्च्या पोलादाची देशाबाहेर होणारी निर्यात रोखण्यासाठी या लोहखनिजावरची ड्यूटी आता 20 टक्के करण्यात आली. यामुळे स्टीलच्या उत्पादनासाठी देशांतर्गत कच्चा माल जास्त उपलब्ध असेल. याचा परिणाम स्टीलच्या किंमती काही प्रमाणात कमी होण्यासाठी होईल. एकंदरीतच या सगळ्या घोषणांमुळे मोठ्या शहरांजवळच्या उपनगरांमध्ये आणि नाशिक, नागपूर, औरंगाबादसारख्या शहरांमध्ये झपाट्याने विस्तार होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 28, 2011 05:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close