S M L

जळगाव पोलिसांच्या रेकॉर्डवर समीर कुलकर्णी अजूनही फरार

6 नोव्हेंबर, मुंबईमालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी एटीएसच्या ताब्यांत असलेला समीर कुलकर्णी जळगाव पोलिसांच्या रेकॉर्डवर आजही फरार आहे. गेल्या अठरा वर्षांपासून त्याच्यावर कोर्टाचं अटक वॉरंट आहे. 1990 मध्ये तलवारी विकल्याचा त्याच्यावर आरोप आहे.जळगावच्या बळीराम पेठ भागात समीर राहायचा. आता या जागी ओम शांती अपार्टमेंट आहे. समीरच्या शेजारीच गोट्या हरीमकर राहायचा. गोट्या आणि समीरवर बेकायदेशीरपणे तलवारी आणून विकण्याचा आरोप आहे. त्यांच्यावर 22 जानेवारी 1990 मध्ये आर्म अ‍ॅक्ट पंचवीस आणि ' सात क ' नुसार पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची करण्यात आलीय. 30 मे 1190 ला जिल्हा सेशन कोर्टातही गुन्हा दाखल झालाय. मात्र, आजही या खटल्याचा निकाल लागलेला नाही. कारण रेकॉर्डवर दोन्ही आरोपी फरार असल्यानं त्यांच्याविरुध्दच पकड वॉरंट आजही तसंच आहे. चार वर्षांपूर्वी गोट्या हरीमकरचा मृत्यू झाला. मात्र समीरवचा गुन्हा खोटा असल्याचं त्याच्या मित्रांचं म्हणणं आहे.जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयात समीरचं शिक्षण झालं.अत्यंत शांत आणि हुशार विद्यार्थी म्हणून समीरची इथं आजही ओळख आहे. त्याच्या घरी तो ब्लो प्लास्टच्या खेळण्यांची जुळणी करायचं काम करायचा. या गल्लीतल्या त्याच्या अनेक मित्रांना त्यानं रोजगारही मिळवून दिला होता. पण, गेल्या सतरा वर्षांपासून तो इथल्या कोणाच्याच संपर्कात नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 6, 2008 11:17 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2008 11:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close