S M L

मंदीमुळे रिटेल क्षेत्रातील नोकर्‍यांचं प्रमाण घटतंय

6 नोव्हेंबर, मुंबईअनेक देशी उद्योगांना आजकाल पैशांची चणचण जाणवतेय. रिटेल क्षेत्रातही याच अडचणी आहेत. त्यामुळे रिटेलमधील कित्येक कंपन्यांनी त्यांच्या भविष्यातील योजनांमध्ये बदल करण्याचं टाळलंय. पण कॉस्ट कटिंगमुळे रिटेल सेक्टरमधील फ्रंटएंड स्टाफसाठीच्या नोकर्‍या कमी होताना दिसत आहेत.मुंबईच्या आर. के. वाधवान इन्स्टिट्यूटनं आतापर्यंत अनेक रिटेल दुकानांसाठी हजाराहून जास्त तरुणांना नोकर्‍या मिळवून दिल्यात. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे अनेक रिटेल कंपन्यांकडूनदेखील एंट्री लेव्हल स्टाफ भरुन देण्यासाठी मागणी येत होती. पण आता रिटेल कंपन्यांनी अशा प्री-प्लेसमेंट ऑफर्स देणं कमी केलंय. इतकंच नव्हे तर काही कंपन्या आपल्या ऑफर्स मागेही घेत आहेत. याआधी इन्स्टिट्यूटकडून 100 टक्के जागा भरल्या जात होत्या. मात्र सध्या त्यांच्याकडून नोकरी मिळवून देण्याचं प्रमाण 20 ते 30 टक्केच उरलं आहे. ' मंदीचा परिणाम आहेच. ऑक्टोबरमध्ये रिटेल दुकांनांची समर ट्रेनिंग संपतात, पण त्यातही जास्त जोश नाही. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नव्या प्लेसमेंट्स येतात. त्याही येत नाही ', असंआर. के. वाधवान इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष चित्तरंजन भट्टाचार्य यांनी सांगितलं.खर्च वाचवण्यासाठी काही रिटेल कंपन्यानी त्यांच्या एंट्री लेव्हलच्या कर्मचार्‍यांचे पगार कमी करण्याची युक्ती शोधली आहे. या कंपन्या कर्मचार्‍यांना अर्धाच पगार हातात सोपवून उरलेला पगार वर्षाअखेरीस देऊ, असं आश्वासन देत आहेत. बँकांकडून कर्ज मिळणं, मुश्कील होतंय त्यामुळे जिथं खर्च जास्त होतोय. तिथं खर्च वाचवण्याचे कंपन्यांचे प्रयत्न सुरु आहेत. इंडिया बुल्स आणि सुभिक्षा रिटेलसारख्या कंपन्यांनी त्यांच्या काही राज्यातल्या शाखा बंद केल्यात. ' वरच्या फळीत काही मोठे बदल घडत नाही. रिटेल सेक्टरचा मूड काही पॉझिटिव्ह नाही. लोक फारशी खरेदी करत नाही. त्यामुळे एंट्री लेव्हलचे कर्मचारी कमी केले जात आहे ', असं अर्न्स्ट अ‍ॅण्ड यंगच्या मुख्य रिटेल प्रॅक्टिस पिनाकी मिश्रा सांगत होत्या. पुढील सहा महिने रिटेल क्षेत्रासाठी कठीण आहेत, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आणखीही काही रिटेल कंपन्या त्यांची आऊटलेट्स बंद करतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे रिटेल क्षेत्रात पाऊल टाकण्यासाठी उत्सुक असणार्‍यांसाठी नोकर्‍यांच्या संधी मर्यादित झाल्यात.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 6, 2008 12:50 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2008 12:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close