S M L

सरकारने मर्जीतल्या सहा बिल्डर्सना जागा वाटप केली - सोमैया

01 मार्चमहाराष्ट्र काँग्रेस आघाडी सरकारनं त्यांच्या मर्जीतल्या सहा बिल्डर्सना मुंबईतली 235 लाख चौ. फूट जमीन एसआरएच्या नियमांतर्गत नियमबाह्य पद्धतीने बहाल केली. असा आरोप भाजपचे राष्ट्रीय सचिव किरीट सोमैया यांनी केला. काँग्रेस सरकारने राजीव गांधी आवास योजना आणि झोपट्टीवासीयांसाठी मोफत घर या नावाने हा घोटाळा केला आहे. असा आरोप करत किरीट सोमैया यांनी सांगितलं की, या सहा प्रकल्पांमधले महत्त्वाचे आदेश 11 नोव्हेंबर रोजी देण्यात आले होते. 11 नोव्हेंबरला तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या पदाचा कार्यभार सोडला तर नवनिर्वाचित मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संध्याकाळी कार्यभार स्वीकारला. त्यामुळे हे दोन्ही नेते या घोटाळ्याला जबाबदार असल्याचा आरोपही सोमैया यांनी केला. या जमिनीचा सध्याचा बाजारभाव 41 हजार 840 कोटी रूपये इतका आहे. पण ही जमीन सरकारने 6 हजार 652 कोटी रूपयांना या बिल्डर्सना दिल्याचा आरोप सोमैया यांनी केला. आणि या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात भाजपतर्फे जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2011 03:15 PM IST

सरकारने मर्जीतल्या सहा बिल्डर्सना जागा वाटप केली - सोमैया

01 मार्च

महाराष्ट्र काँग्रेस आघाडी सरकारनं त्यांच्या मर्जीतल्या सहा बिल्डर्सना मुंबईतली 235 लाख चौ. फूट जमीन एसआरएच्या नियमांतर्गत नियमबाह्य पद्धतीने बहाल केली. असा आरोप भाजपचे राष्ट्रीय सचिव किरीट सोमैया यांनी केला. काँग्रेस सरकारने राजीव गांधी आवास योजना आणि झोपट्टीवासीयांसाठी मोफत घर या नावाने हा घोटाळा केला आहे. असा आरोप करत किरीट सोमैया यांनी सांगितलं की, या सहा प्रकल्पांमधले महत्त्वाचे आदेश 11 नोव्हेंबर रोजी देण्यात आले होते. 11 नोव्हेंबरला तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या पदाचा कार्यभार सोडला तर नवनिर्वाचित मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संध्याकाळी कार्यभार स्वीकारला.

त्यामुळे हे दोन्ही नेते या घोटाळ्याला जबाबदार असल्याचा आरोपही सोमैया यांनी केला. या जमिनीचा सध्याचा बाजारभाव 41 हजार 840 कोटी रूपये इतका आहे. पण ही जमीन सरकारने 6 हजार 652 कोटी रूपयांना या बिल्डर्सना दिल्याचा आरोप सोमैया यांनी केला. आणि या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात भाजपतर्फे जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2011 03:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close