S M L

महाशिवरात्री निमित्त भाविकांची मंदिरात गर्दी

02 मार्चमहाशिवरात्रीच्या निमित्ताने देशभरातील महादेवाच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरच्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातल्या भाविकांनी गर्दी केली. त्र्यंबकेश्वर मंदिरात विधीवत पूजाविधी संपन्न होत आहेत. तर अंबरनाथमध्येही प्राचीन शिवाचं मंदिर आहे. भूमीज शैलीतल्या या मंदिराचा युनोस्कोच्या 218 कलासंपन्न वास्तूंच्या यादीत समावेश आहे. राजा मुवणी यानं अकराव्या शतकात हे मंदिर बांधलं असं म्हटलं जातं. 900 वर्षांपूर्वीचं हे मंदिर वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. महाशिवरात्रीला इथल्या पंचक्रोशीतली सगळ्यात मोठी यात्रा इथं भरते. नागपूरच्या मार्कंड मंदिरातही भाविकांनी गर्दी केली. याशिवाय उल्हासनगरमध्ये महादेवाची 36 फुटी मूर्ती असून 12 ज्योतिर्लिंगांची प्रतिकृतीही साकारण्यात आली. काल रात्रीपासूनच शिवभक्तांनी इथं दर्शनासाठी गर्दी केली आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 2, 2011 10:45 AM IST

महाशिवरात्री निमित्त भाविकांची मंदिरात गर्दी

02 मार्च

महाशिवरात्रीच्या निमित्ताने देशभरातील महादेवाच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरच्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातल्या भाविकांनी गर्दी केली. त्र्यंबकेश्वर मंदिरात विधीवत पूजाविधी संपन्न होत आहेत. तर अंबरनाथमध्येही प्राचीन शिवाचं मंदिर आहे. भूमीज शैलीतल्या या मंदिराचा युनोस्कोच्या 218 कलासंपन्न वास्तूंच्या यादीत समावेश आहे. राजा मुवणी यानं अकराव्या शतकात हे मंदिर बांधलं असं म्हटलं जातं. 900 वर्षांपूर्वीचं हे मंदिर वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. महाशिवरात्रीला इथल्या पंचक्रोशीतली सगळ्यात मोठी यात्रा इथं भरते. नागपूरच्या मार्कंड मंदिरातही भाविकांनी गर्दी केली. याशिवाय उल्हासनगरमध्ये महादेवाची 36 फुटी मूर्ती असून 12 ज्योतिर्लिंगांची प्रतिकृतीही साकारण्यात आली. काल रात्रीपासूनच शिवभक्तांनी इथं दर्शनासाठी गर्दी केली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 2, 2011 10:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close