S M L

खतरों के खिलाडी पुन्हा अक्षयकडे ?

03 मार्चसगळीकडे चर्चा सुरू आहे की अक्षय कुमार खतरों के खिलाडीचा नवा सिझन होस्ट करणार आहे. कदाचित हे खरं असूही शकतं कारण खतरों के खिलाडीनंतर बॉलिवूडमध्ये अक्षयचा एकही सिनेमा रिलीज झालेला नाही.खिलाडी अक्षयकुमार आता बॉलिवूडच्या टॉपलिस्टवर अजिबातच नाही. त्याचे शेवटचे चार सिनेमेच बॉक्सऑफिसवर फ्लॉप तर झाले. पण बॉक्स ऑफिस रिपोर्टनुसार पटीयाला हाउसचं ओपनिंगसुद्धा चांगलं नव्हतं. अक्षयची सिनेमांची निवड मर्यादीतच असते. कॉमेडी किंवा रोमँटीक ड्रामा. 2010 मध्ये अक्षयचे चार सिनेमे रिलीज झाले होते. त्यामुळे आता अक्कीला आमीरचा फंडा अमलात आणावा लागेल कमी पण चांगले सिनेमे...? अक्षयकुमार म्हणतो की, खरतर असं नाही खूपसारे सिनेमे मी एन्जॉय करतोय आणि उतार-चढाव हे करिअरमध्ये एकदातरी येतचं असतं. वारंवारच्या फ्लॉप्समुळे खिलाडीचं स्पिरीट अजिबात कमी झालेलं नाही. तो त्याच्या आगामी सिनेमांसाठी सज्ज आहे. अनीस बाझमीचा थँक्यू ज्यामध्ये सोनम कपूरही आहे. तसेच यावर्षी तो एका इंटरनॅशनल प्रोजेक्टवरही काम करत आहे. त्याने कॉमेडीयन रूसेल पेटरसह कॅनडात एका इंग्रजी भाषेच्या सिनेमाची निर्मिती केली आहे. ब्रेक अवे हा सिनेमा आइस हॉकी आणि वडिल मुलाच्या नातेसंबंधावर आहे. तर कॅनडीयन टुरिझमसाठी ब्रँड ऍम्बेसेडरम्हणून अक्षयची निवड झाली आहे. पण अक्षयसाठी हे एकमेव कॅनेडीयन कनेक्शन नाही. यावर अक्षय म्हणतो की, ट्विंकल आणि मी कॅनडामध्ये एकमेकांच्या प्रेमात पडलो. माझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती ती नायगरा धबधबा बघण्याची. जेव्हा माझं सिनेमाचं शूट होतं त्यावेळेस मी त्यांना तिथे घेऊन गेलो. त्यामुळे मला तो देश आवडतो. अक्कीसाठी काहीच साध्य झालं नाही तेव्हा तो पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये परतला आहे. पण अशावेळेस हे कॅनेडीयन प्रोडक्शन सार्थकी ठरो म्हणजे झालं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 3, 2011 12:59 PM IST

खतरों के खिलाडी पुन्हा अक्षयकडे ?

03 मार्च

सगळीकडे चर्चा सुरू आहे की अक्षय कुमार खतरों के खिलाडीचा नवा सिझन होस्ट करणार आहे. कदाचित हे खरं असूही शकतं कारण खतरों के खिलाडीनंतर बॉलिवूडमध्ये अक्षयचा एकही सिनेमा रिलीज झालेला नाही.

खिलाडी अक्षयकुमार आता बॉलिवूडच्या टॉपलिस्टवर अजिबातच नाही. त्याचे शेवटचे चार सिनेमेच बॉक्सऑफिसवर फ्लॉप तर झाले. पण बॉक्स ऑफिस रिपोर्टनुसार पटीयाला हाउसचं ओपनिंगसुद्धा चांगलं नव्हतं. अक्षयची सिनेमांची निवड मर्यादीतच असते. कॉमेडी किंवा रोमँटीक ड्रामा. 2010 मध्ये अक्षयचे चार सिनेमे रिलीज झाले होते. त्यामुळे आता अक्कीला आमीरचा फंडा अमलात आणावा लागेल कमी पण चांगले सिनेमे...? अक्षयकुमार म्हणतो की, खरतर असं नाही खूपसारे सिनेमे मी एन्जॉय करतोय आणि उतार-चढाव हे करिअरमध्ये एकदातरी येतचं असतं.

वारंवारच्या फ्लॉप्समुळे खिलाडीचं स्पिरीट अजिबात कमी झालेलं नाही. तो त्याच्या आगामी सिनेमांसाठी सज्ज आहे. अनीस बाझमीचा थँक्यू ज्यामध्ये सोनम कपूरही आहे. तसेच यावर्षी तो एका इंटरनॅशनल प्रोजेक्टवरही काम करत आहे. त्याने कॉमेडीयन रूसेल पेटरसह कॅनडात एका इंग्रजी भाषेच्या सिनेमाची निर्मिती केली आहे. ब्रेक अवे हा सिनेमा आइस हॉकी आणि वडिल मुलाच्या नातेसंबंधावर आहे. तर कॅनडीयन टुरिझमसाठी ब्रँड ऍम्बेसेडरम्हणून अक्षयची निवड झाली आहे. पण अक्षयसाठी हे एकमेव कॅनेडीयन कनेक्शन नाही.

यावर अक्षय म्हणतो की, ट्विंकल आणि मी कॅनडामध्ये एकमेकांच्या प्रेमात पडलो. माझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती ती नायगरा धबधबा बघण्याची. जेव्हा माझं सिनेमाचं शूट होतं त्यावेळेस मी त्यांना तिथे घेऊन गेलो. त्यामुळे मला तो देश आवडतो. अक्कीसाठी काहीच साध्य झालं नाही तेव्हा तो पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये परतला आहे. पण अशावेळेस हे कॅनेडीयन प्रोडक्शन सार्थकी ठरो म्हणजे झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 3, 2011 12:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close