S M L

शिवाजी देशमुख यांची काँग्रेस वर्किंग कमिटीवर नियुक्ती

04 मार्चकाँग्रेस वर्किंग कमिटीची नवी कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली. त्यानुसार विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांची काँग्रेस वर्किंग कमिटीवर कायम निमंत्रित म्हणून नियुक्त करण्यात आली तर अनिस अहमद, अविनाश पांडे, प्रिया दत्त आणि संजय निरुपम यांची या कमिटीमध्ये सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. पण महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय ग्रामविकास मंत्री विलासराव देशमुख जे या पक्षाच्या वर्किंग कमिटीवर कायम निमंत्रित होते त्यांना आता हटवण्यात आलं आहे. तसेच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी म्हणून मोहन प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांची नियुक्ती ए. एन्टोनी यांच्या जागी करण्यात आली. या फेरबदलामुळे काँग्रेसच्या राज्यातल्या राजकारणात अनेक बदल होण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 4, 2011 12:08 PM IST

शिवाजी देशमुख यांची काँग्रेस वर्किंग कमिटीवर नियुक्ती

04 मार्च

काँग्रेस वर्किंग कमिटीची नवी कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली. त्यानुसार विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांची काँग्रेस वर्किंग कमिटीवर कायम निमंत्रित म्हणून नियुक्त करण्यात आली तर अनिस अहमद, अविनाश पांडे, प्रिया दत्त आणि संजय निरुपम यांची या कमिटीमध्ये सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. पण महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय ग्रामविकास मंत्री विलासराव देशमुख जे या पक्षाच्या वर्किंग कमिटीवर कायम निमंत्रित होते त्यांना आता हटवण्यात आलं आहे. तसेच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी म्हणून मोहन प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांची नियुक्ती ए. एन्टोनी यांच्या जागी करण्यात आली. या फेरबदलामुळे काँग्रेसच्या राज्यातल्या राजकारणात अनेक बदल होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 4, 2011 12:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close