S M L

पुण्यात घरघुती सिलेंडरच्या स्फोटात 5 जखमी

07 मार्चसिलेंडरमधून गॅसगळती होऊन झालेल्या स्फोटामध्ये दोन लहान मुलांसह 5 नागरिक जखमी झाल्याची गंभीर घटना पुणे जिल्हयातील चाकण गावात घडली. चाकण गावातील देशमुख आळीत राहणार्‍या शरद राक्षे यांच्या घरात रात्रभर घरगुती गॅस गळती होऊन तो घरभर पसरला. घरातील लोकांनी सिलेंडर बघण्यासाठी स्वयंपाक घरातील लाईट ऑन केला असता घरात पसरलेल्या गॅसनी पेट घेतला आणि त्याचा मोठा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता ऐवढी मोठी होती की, घराची चार फुटी भिंत फुटली त्याचं बरोबर घरातील सगळे सामान जळून खाक झाले आणि घराचा दरवाजा 100 फुटांपेक्षा अधिक लांब फेकल्या गेला. या घटनेत राक्षे कुटुंबातील चोघे जण भाजले तर शेजारच्या घरातील 3 मुलीही किरकोळ भाजल्या. सध्या या सर्वांवर पिंपरी-चिचंवड इथल्या वाय.सी.एम. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून राक्षे यांची प्रकृती चिंताजनक असल्याच समजते.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 7, 2011 04:52 PM IST

पुण्यात घरघुती सिलेंडरच्या स्फोटात 5 जखमी

07 मार्च

सिलेंडरमधून गॅसगळती होऊन झालेल्या स्फोटामध्ये दोन लहान मुलांसह 5 नागरिक जखमी झाल्याची गंभीर घटना पुणे जिल्हयातील चाकण गावात घडली. चाकण गावातील देशमुख आळीत राहणार्‍या शरद राक्षे यांच्या घरात रात्रभर घरगुती गॅस गळती होऊन तो घरभर पसरला. घरातील लोकांनी सिलेंडर बघण्यासाठी स्वयंपाक घरातील लाईट ऑन केला असता घरात पसरलेल्या गॅसनी पेट घेतला आणि त्याचा मोठा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता ऐवढी मोठी होती की, घराची चार फुटी भिंत फुटली त्याचं बरोबर घरातील सगळे सामान जळून खाक झाले आणि घराचा दरवाजा 100 फुटांपेक्षा अधिक लांब फेकल्या गेला. या घटनेत राक्षे कुटुंबातील चोघे जण भाजले तर शेजारच्या घरातील 3 मुलीही किरकोळ भाजल्या. सध्या या सर्वांवर पिंपरी-चिचंवड इथल्या वाय.सी.एम. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून राक्षे यांची प्रकृती चिंताजनक असल्याच समजते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 7, 2011 04:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close