S M L

शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत 46 महाविद्यालयाना दिलासा

08 मार्चशिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत 46 महाविद्यालयातील विद्यार्थांच कोणत्याही परिस्थीतीत नुकसान होऊ देणार नाही. असं शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एन.जे.पवार यांनी सांगितले आहे. महाविद्यालयाच्या संस्थाचालकांनी प्राचार्यांची नेमणूक केली नाही म्हणून न्यायालयाच्या आदेशानूसार विद्यापीठ प्रशासनाने बी.ए, बी.एस्सी, आणि बी कॉम प्रथम वर्गाचे साडे चार हजार विद्यार्थांना परीक्षेला परवानगी नाकारली होती. पण विद्यापीठ प्रशासनाने याबाबत न्यायालयात दाद मागणार असून यामध्ये संस्था चालकांची चूक असून विद्यार्थांना परिक्षेला बसण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करणार आहे. आज शिवसेनेनं कुलगुरु डॉ.एन.जे.पवार यांना घेराव घालुन जाब विचारला. त्याचबरोबर कोणत्याही परिस्थीतीत विद्यार्थाचं नुकसान होवु नये अशी मागणी केली. यावेळी शिवसैनिकांनी विद्यापीठ सुरक्षा रक्षकांच्या चुकीच्या वागणुकीमुळे कुलगुरुच्या समोर त्याला धारेवर धरलं. त्यामुळे काही वेळ कुलगुरुच्या दालनात गोंधळ निर्माण झाला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 8, 2011 12:34 PM IST

शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत 46 महाविद्यालयाना दिलासा

08 मार्च

शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत 46 महाविद्यालयातील विद्यार्थांच कोणत्याही परिस्थीतीत नुकसान होऊ देणार नाही. असं शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एन.जे.पवार यांनी सांगितले आहे. महाविद्यालयाच्या संस्थाचालकांनी प्राचार्यांची नेमणूक केली नाही म्हणून न्यायालयाच्या आदेशानूसार विद्यापीठ प्रशासनाने बी.ए, बी.एस्सी, आणि बी कॉम प्रथम वर्गाचे साडे चार हजार विद्यार्थांना परीक्षेला परवानगी नाकारली होती. पण विद्यापीठ प्रशासनाने याबाबत न्यायालयात दाद मागणार असून यामध्ये संस्था चालकांची चूक असून विद्यार्थांना परिक्षेला बसण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करणार आहे. आज शिवसेनेनं कुलगुरु डॉ.एन.जे.पवार यांना घेराव घालुन जाब विचारला. त्याचबरोबर कोणत्याही परिस्थीतीत विद्यार्थाचं नुकसान होवु नये अशी मागणी केली. यावेळी शिवसैनिकांनी विद्यापीठ सुरक्षा रक्षकांच्या चुकीच्या वागणुकीमुळे कुलगुरुच्या समोर त्याला धारेवर धरलं. त्यामुळे काही वेळ कुलगुरुच्या दालनात गोंधळ निर्माण झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 8, 2011 12:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close