S M L

राज्यात 14 जिल्ह्यात मुलींची संख्या घटली !

अलका धुपकर मुंबई08 मार्चदेशामध्ये स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी कायदा करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य. पण महाराष्ट्रात दर हजारी पुरुषांमागे मुलींची संख्या झपाट्याने कमी होत चाललीय. याआधी नगर आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या 8 जिल्ह्यात मुलींच्या संख्येचं चित्र विदारक होतं. ते कमी होण्याऐवजी आता एकूण 14 जिल्ह्यांमध्ये मुलींची संख्या घसरली आहे.महिला दिनाच्या निमित्ताने मुलींच्या अस्तित्वासाठी अशी जंग छेडण्याची वेळ महाराष्ट्रातल्या संघटनांवर आली. वर्षा देशपांडे यांच्या 'लेक लाडकी अभियाना' अंतर्गत सातार्‍यासह विविध जिल्ह्यांतल्या महिलांनी आझाद मैदानात धरणं धरलंय. ज्या ज्या जिल्ह्यांत सोनोग्राफी मशीन्स आहेत तिथं तिथं मुली जन्माआधीच मारल्या जात आहे आणि त्यावर अनेकांचे खिसे भरत आहेत. आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी तर कायद्याच्या अंमलबजावणीकडे संपूर्ण पाठ फिरवली.स्त्रीभ्रूणहत्या रोखणारा कायदा; अंमलबजावणीतलं अपयश- केंद्रात सुपरवायजरी बोर्ड निष्क्रिय- सहा महिन्यातून एकदा बैठक अपेक्षित- राज्यात पर्यवेक्षकीय समिती निष्क्रिय- दर चार महिन्याला बैठक अपेक्षित- पण केंद्रात किंवा राज्यात बैठका होतच नाही- राज्य तपासणी आणि मूल्यमापन समितीही निष्क्रिय- राज्य समुचित प्राधिकार्‍यांतर्फे ठोस कार्यवाही नाही- राज्यात 150 पैकी 36 गुन्ह्यांमध्ये अपील नाही- राज्यात कायद्याअंतर्गत नोंदवलेल्या 90 केसेस प्रलंबित- महाराष्ट्रात 7,000 सोनोग्राफी सेंटर्स- त्यांचं रेग्युलेशन होतच नाही

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 8, 2011 05:04 PM IST

राज्यात 14 जिल्ह्यात मुलींची संख्या घटली !

अलका धुपकर मुंबई

08 मार्च

देशामध्ये स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी कायदा करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य. पण महाराष्ट्रात दर हजारी पुरुषांमागे मुलींची संख्या झपाट्याने कमी होत चाललीय. याआधी नगर आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या 8 जिल्ह्यात मुलींच्या संख्येचं चित्र विदारक होतं. ते कमी होण्याऐवजी आता एकूण 14 जिल्ह्यांमध्ये मुलींची संख्या घसरली आहे.

महिला दिनाच्या निमित्ताने मुलींच्या अस्तित्वासाठी अशी जंग छेडण्याची वेळ महाराष्ट्रातल्या संघटनांवर आली. वर्षा देशपांडे यांच्या 'लेक लाडकी अभियाना' अंतर्गत सातार्‍यासह विविध जिल्ह्यांतल्या महिलांनी आझाद मैदानात धरणं धरलंय.

ज्या ज्या जिल्ह्यांत सोनोग्राफी मशीन्स आहेत तिथं तिथं मुली जन्माआधीच मारल्या जात आहे आणि त्यावर अनेकांचे खिसे भरत आहेत. आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी तर कायद्याच्या अंमलबजावणीकडे संपूर्ण पाठ फिरवली.

स्त्रीभ्रूणहत्या रोखणारा कायदा; अंमलबजावणीतलं अपयश

- केंद्रात सुपरवायजरी बोर्ड निष्क्रिय- सहा महिन्यातून एकदा बैठक अपेक्षित- राज्यात पर्यवेक्षकीय समिती निष्क्रिय- दर चार महिन्याला बैठक अपेक्षित- पण केंद्रात किंवा राज्यात बैठका होतच नाही- राज्य तपासणी आणि मूल्यमापन समितीही निष्क्रिय- राज्य समुचित प्राधिकार्‍यांतर्फे ठोस कार्यवाही नाही- राज्यात 150 पैकी 36 गुन्ह्यांमध्ये अपील नाही- राज्यात कायद्याअंतर्गत नोंदवलेल्या 90 केसेस प्रलंबित- महाराष्ट्रात 7,000 सोनोग्राफी सेंटर्स- त्यांचं रेग्युलेशन होतच नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 8, 2011 05:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close