S M L

अपंगांच्या शाळांना अनुदानित दर्जासाठी आमरण उपोषण सुरू

09 मार्चराज्यातील अपंगांच्या विशेष शाळांना अनुदानित शाळांचा दर्जा मिळावा यासाठी एक मार्चपासून मुंबईत आझाद मैदानात आमरण उपोषण सुरु आहे. अपंगांसाठी विशेष शाळा चालवणारे संस्थाचालक आणि शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. आमरण उपोषणाच्या आठव्या दिवशी यापैकी 9 जणांची प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे त्यांना सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. राज्यातील अशा शेकडो शाळांना अनुदान देण्याचे आदेश 2008 मध्ये राज्यसरकारने दिले होते. पण समाजकल्याण खात्याने या आदेशाची अंमलबजावणीच केली नाही. दुसरीकडे, 2010 मध्ये समाजकल्याण आयुक्तांकडे पुन्हा एकदा सर्व शाळांनी अनुदानासाठीचा प्रस्तावही सादर केला. पण समाजकल्याण मंत्री शिवाजीराव मोघे या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. संस्थाचालकांना शाळा चालवणं कठीण झाल्यामुळे त्याचा त्रास अपंग विद्यार्थ्यांना होतोय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 9, 2011 10:10 AM IST

अपंगांच्या शाळांना अनुदानित दर्जासाठी आमरण उपोषण सुरू

09 मार्च

राज्यातील अपंगांच्या विशेष शाळांना अनुदानित शाळांचा दर्जा मिळावा यासाठी एक मार्चपासून मुंबईत आझाद मैदानात आमरण उपोषण सुरु आहे. अपंगांसाठी विशेष शाळा चालवणारे संस्थाचालक आणि शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. आमरण उपोषणाच्या आठव्या दिवशी यापैकी 9 जणांची प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे त्यांना सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. राज्यातील अशा शेकडो शाळांना अनुदान देण्याचे आदेश 2008 मध्ये राज्यसरकारने दिले होते. पण समाजकल्याण खात्याने या आदेशाची अंमलबजावणीच केली नाही. दुसरीकडे, 2010 मध्ये समाजकल्याण आयुक्तांकडे पुन्हा एकदा सर्व शाळांनी अनुदानासाठीचा प्रस्तावही सादर केला. पण समाजकल्याण मंत्री शिवाजीराव मोघे या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. संस्थाचालकांना शाळा चालवणं कठीण झाल्यामुळे त्याचा त्रास अपंग विद्यार्थ्यांना होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 9, 2011 10:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close