S M L

सनातन संस्थेवर राज्य सरकार बंदी घालण्याची शक्यता

11 मार्चठाणे, नवी मुंबई आणि गोव्यातल्या बाँबस्फोटांमध्ये सनातनच्या कार्यकर्त्यांचा सहभाग स्पष्ट झाल्याने राज्य सरकार सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. त्याबाबतचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांनी राज्य सरकारकडे पाठवल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली. `अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रीव्हेन्शन ऍक्ट` या कायद्यानुसार ही बंदी घालण्यात येणार आहे. ठाण्यातल्या गडकरी रंगायतन, वाशीतल्या विष्णुदास भावे नाट्यगृह आणि गोव्यातल्या बाँबस्फोटात सनातनच्या कार्यकर्त्यांचा सहभाग स्पष्ट झाल्याचा दावा पोलिसांनी केला. केंद्र आणि राज्य सरकारच्या गुप्तचर विभागाने गेल्या वर्षभरात सनातनच्या हालचालींवर नजर ठेवली होती. त्यातूनही महत्वाची माहिती पोलिसांना मिळाली. या सगळ्याचा विचार करता बंदी घालण्याच्या निर्णयाचा विचार होत असल्याचे आर.आर. पाटील यांनी सांगितलं. दरम्यान शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी या प्रस्ताववर टीका केली आहे. केवळ मतांच्या लाचारीपोटी राज्य सरकार सनातनवर बंदी लादतंय अशी टीका मनोहर जोशी यांनी केली. सनातनचे कारनामे - 31 मे 2008 ला वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात 2 क्रुड बॉम्ब पेरले - 4 जून 2008 ला गडकरी रंगायतनमध्ये स्फोट - 17 ऑक्टोबर 2009 ला मडगांवला स्फोट- बॉम्बची जुळवाजुळव करताना मलगोंडा पाटलाचा मृत्यू - मलगोंडा पाटील सनातनचा साधक- दंगलीत सनातन प्रभातमधून धार्मिक भावना भडकावणारं लिखाण-'हिंदूनो नक्षलवादी बना' सनातन प्रभातमधून संदेश - आम्ही पाचपुते नाटकाच्या विरोधात सनातन प्रभातमधून लिखाण- जोधा अकबर चित्रपटाच्या विरोधात सनातन प्रभातमधून लिखाण- रमेश गडकरी आणि मंगेश निकम या दोघांना या प्रकरणात अटक

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 11, 2011 10:24 AM IST

सनातन संस्थेवर राज्य सरकार बंदी घालण्याची शक्यता

11 मार्च

ठाणे, नवी मुंबई आणि गोव्यातल्या बाँबस्फोटांमध्ये सनातनच्या कार्यकर्त्यांचा सहभाग स्पष्ट झाल्याने राज्य सरकार सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. त्याबाबतचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांनी राज्य सरकारकडे पाठवल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली. `अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रीव्हेन्शन ऍक्ट` या कायद्यानुसार ही बंदी घालण्यात येणार आहे.

ठाण्यातल्या गडकरी रंगायतन, वाशीतल्या विष्णुदास भावे नाट्यगृह आणि गोव्यातल्या बाँबस्फोटात सनातनच्या कार्यकर्त्यांचा सहभाग स्पष्ट झाल्याचा दावा पोलिसांनी केला. केंद्र आणि राज्य सरकारच्या गुप्तचर विभागाने गेल्या वर्षभरात सनातनच्या हालचालींवर नजर ठेवली होती. त्यातूनही महत्वाची माहिती पोलिसांना मिळाली. या सगळ्याचा विचार करता बंदी घालण्याच्या निर्णयाचा विचार होत असल्याचे आर.आर. पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी या प्रस्ताववर टीका केली आहे. केवळ मतांच्या लाचारीपोटी राज्य सरकार सनातनवर बंदी लादतंय अशी टीका मनोहर जोशी यांनी केली.

सनातनचे कारनामे

- 31 मे 2008 ला वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात 2 क्रुड बॉम्ब पेरले - 4 जून 2008 ला गडकरी रंगायतनमध्ये स्फोट - 17 ऑक्टोबर 2009 ला मडगांवला स्फोट- बॉम्बची जुळवाजुळव करताना मलगोंडा पाटलाचा मृत्यू - मलगोंडा पाटील सनातनचा साधक- दंगलीत सनातन प्रभातमधून धार्मिक भावना भडकावणारं लिखाण-'हिंदूनो नक्षलवादी बना' सनातन प्रभातमधून संदेश - आम्ही पाचपुते नाटकाच्या विरोधात सनातन प्रभातमधून लिखाण- जोधा अकबर चित्रपटाच्या विरोधात सनातन प्रभातमधून लिखाण- रमेश गडकरी आणि मंगेश निकम या दोघांना या प्रकरणात अटक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 11, 2011 10:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close