S M L

बांगलाच्या वाघानी केली गोर्‍यांची शिकार !

11 मार्चवर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडला आणखी एका धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. चुरशीच्या झालेल्या लढतीत बांगलादेशने इंग्लंडचा 2 विकेट आणि सहा बॉल राखून पराभव केला. या विजयाबरोबरच बांगलादेशने क्वार्टर फायनलच्या शर्यतीत आपलं स्थान टीकवून ठेवले आहे. पहिली बॅटिंग करणार्‍या इंग्लंडची टीम 225 रन्सवर ऑलआऊट झाली. याला उत्तर देताना बांगलादेशनं सुरुवात चांगली केली. तामिम इक्बाल आणि इमरुल कयास या ओपनिंग जोडीनं पहिल्या विकेटसाठी 52रन्सची पार्टनरशिप केली. तामिम 38 तर इमरुल 60 रन्सवर आऊट झाले. यानंतर बांगलादेशची मधली फळी झटपट कोसळली. 169 रन्सवर 8 विकेट अशी बांगलादेशची अवस्था झाली. पण यानंतर मोहम्मदुल्ला आणि नवव्या क्रमांकावर आलेल्या शफिउल इस्लामनं झुंजार बॅटिंग केली. या जोडीने नवव्या विकेटसाठी 58 रन्सची पार्टनरशिप करत बांगलादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. बांगलादेशचा स्पर्धेतला हा दुसरा विजय तर इंग्लंडचा दुसरा पराभव ठरला. 60 रन्सची मॅचविनिंग खेळी करणारा इमरुल कयास मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 11, 2011 06:13 PM IST

बांगलाच्या वाघानी केली गोर्‍यांची शिकार !

11 मार्च

वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडला आणखी एका धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. चुरशीच्या झालेल्या लढतीत बांगलादेशने इंग्लंडचा 2 विकेट आणि सहा बॉल राखून पराभव केला. या विजयाबरोबरच बांगलादेशने क्वार्टर फायनलच्या शर्यतीत आपलं स्थान टीकवून ठेवले आहे. पहिली बॅटिंग करणार्‍या इंग्लंडची टीम 225 रन्सवर ऑलआऊट झाली. याला उत्तर देताना बांगलादेशनं सुरुवात चांगली केली. तामिम इक्बाल आणि इमरुल कयास या ओपनिंग जोडीनं पहिल्या विकेटसाठी 52रन्सची पार्टनरशिप केली.

तामिम 38 तर इमरुल 60 रन्सवर आऊट झाले. यानंतर बांगलादेशची मधली फळी झटपट कोसळली. 169 रन्सवर 8 विकेट अशी बांगलादेशची अवस्था झाली. पण यानंतर मोहम्मदुल्ला आणि नवव्या क्रमांकावर आलेल्या शफिउल इस्लामनं झुंजार बॅटिंग केली. या जोडीने नवव्या विकेटसाठी 58 रन्सची पार्टनरशिप करत बांगलादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. बांगलादेशचा स्पर्धेतला हा दुसरा विजय तर इंग्लंडचा दुसरा पराभव ठरला. 60 रन्सची मॅचविनिंग खेळी करणारा इमरुल कयास मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 11, 2011 06:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close