S M L

जपानमध्ये आणखी एक भूकंपाचा धक्का

14 मार्चजपानमध्ये आजही 5.8 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला आहे. कालही इथं 6.2 रिश्टर स्केलचा मोठा आफ्टर शॉक बसला होता. शुक्रवारच्या भूकंपानंतर मियागी शहरातील जवळपास दहा हजार लोक बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा अजूनही वाढण्याची भीती आहे. दरम्यान जपानमध्ये जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. भारताच्या मदतीच्या पहिल्या फेरीत जपानसाठी 22 टन ब्लॅकेंटस् रवाना झालेत. जपानमध्ये जगभरातल्या 70 देशांची मदत आणि बचाव पथकं दाखल झाली आहेत.जपानमधल्या सोनी, टोयोटा, निसान, होंडा या सगळ्या मोठ्या कंपन्यांसकट इतरही अनेक कंपन्यांचे प्रकल्प ठप्प झाले आहेत. या प्रकल्पांमधील उत्पादन थांबवण्यात आलंय. दरम्यान 11 मार्चला झालेला भूकंप हा 9.0 रिश्टर स्केल एवढा होता अशी माहिती देण्यात येतेय. जपान सरकारनं या अगोदर हा धक्का 9.8 रिश्टर स्केल एवढा सांगितला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 14, 2011 09:13 AM IST

जपानमध्ये आणखी एक भूकंपाचा धक्का

14 मार्च

जपानमध्ये आजही 5.8 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला आहे. कालही इथं 6.2 रिश्टर स्केलचा मोठा आफ्टर शॉक बसला होता. शुक्रवारच्या भूकंपानंतर मियागी शहरातील जवळपास दहा हजार लोक बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा अजूनही वाढण्याची भीती आहे. दरम्यान जपानमध्ये जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. भारताच्या मदतीच्या पहिल्या फेरीत जपानसाठी 22 टन ब्लॅकेंटस् रवाना झालेत. जपानमध्ये जगभरातल्या 70 देशांची मदत आणि बचाव पथकं दाखल झाली आहेत.

जपानमधल्या सोनी, टोयोटा, निसान, होंडा या सगळ्या मोठ्या कंपन्यांसकट इतरही अनेक कंपन्यांचे प्रकल्प ठप्प झाले आहेत. या प्रकल्पांमधील उत्पादन थांबवण्यात आलंय. दरम्यान 11 मार्चला झालेला भूकंप हा 9.0 रिश्टर स्केल एवढा होता अशी माहिती देण्यात येतेय. जपान सरकारनं या अगोदर हा धक्का 9.8 रिश्टर स्केल एवढा सांगितला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2011 09:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close