S M L

जैतापूर प्रकल्पाला त्सुनामीचा धोका नाही - डॉ.काकोडकर

14 मार्च जैतापूर उंच पठारावर असल्यानं तिथे त्सुनामीचा धोका नाही असं मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर जैतापूर भूकंपप्रवण भागात येत नसल्यामुळे या प्रकल्पाला भूकंपाचाही धोका नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. विधानभवनात देशाच्या विकासात अणुऊर्जेचा वाटा यावर आमदारांसाठी आणि मान्यवरांसाठी डॉ. काकोडकर यांचं भाषण होतं. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. विधानभवनात आयोजित करण्यात आलेल्या आपल्या भाषणात डॉ. काकोडकर म्हणाले की, जैतापूरमध्ये मासेमारीवर कोणताही परिणाम होणार नाही. प्रकल्पामध्ये पर्यावरण संवर्धनासाठी जास्त जागा संपादीत करण्याचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर तारापूर प्रकल्पाच्या आत चिकुची आणि नारळाची झाडं आहेत आणि नरोरा अणुऊर्जा प्रकल्पातही तशा प्रकारची झाडे लावण्यात आली असंही त्यांनी म्हटलं आहे. सध्या देशात मागणीच्या दृष्टीनं विजेचा पुरवठा कमी आहे. त्यासाठी वीज निर्मिती क्षमता वाढवायला हवी. अशा परिस्थितीत अणुऊर्जा देशासाठी महत्त्वाचीच आहे असं मत ही डॉ.काकोडतर यांनी व्यक्त केलं. तसेच अणुऊर्जा स्विकारली नाही तर भविष्यात कोळशासोबतच वीजही आयात करावी लागेल आणि त्याचा परिणाम आपल्या देशाच्या विकासावरही होऊ शकतो असा इशाराही डॉ. काकोडकर यांनी दिला. युरोनियमचं प्रमाण जरी देशात कमी असलं तरी थोरिअमचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. ज्याच्यामुळे भविष्यात अणुइंधनासाठी आपल्याला इतर देशांवर अवलंबुन राहवे लागणार नाही. फुकुशिमामध्ये प्रेशर कमी करण्यासाठी रेडिएशन थोड्याप्रमाणात सोडावे लागले होते. मात्र त्याचा धोका नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 14, 2011 11:09 AM IST

जैतापूर प्रकल्पाला त्सुनामीचा धोका नाही - डॉ.काकोडकर

14 मार्च

जैतापूर उंच पठारावर असल्यानं तिथे त्सुनामीचा धोका नाही असं मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर जैतापूर भूकंपप्रवण भागात येत नसल्यामुळे या प्रकल्पाला भूकंपाचाही धोका नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. विधानभवनात देशाच्या विकासात अणुऊर्जेचा वाटा यावर आमदारांसाठी आणि मान्यवरांसाठी डॉ. काकोडकर यांचं भाषण होतं. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

विधानभवनात आयोजित करण्यात आलेल्या आपल्या भाषणात डॉ. काकोडकर म्हणाले की, जैतापूरमध्ये मासेमारीवर कोणताही परिणाम होणार नाही. प्रकल्पामध्ये पर्यावरण संवर्धनासाठी जास्त जागा संपादीत करण्याचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर तारापूर प्रकल्पाच्या आत चिकुची आणि नारळाची झाडं आहेत आणि नरोरा अणुऊर्जा प्रकल्पातही तशा प्रकारची झाडे लावण्यात आली असंही त्यांनी म्हटलं आहे. सध्या देशात मागणीच्या दृष्टीनं विजेचा पुरवठा कमी आहे. त्यासाठी वीज निर्मिती क्षमता वाढवायला हवी. अशा परिस्थितीत अणुऊर्जा देशासाठी महत्त्वाचीच आहे असं मत ही डॉ.काकोडतर यांनी व्यक्त केलं. तसेच अणुऊर्जा स्विकारली नाही तर भविष्यात कोळशासोबतच वीजही आयात करावी लागेल आणि त्याचा परिणाम आपल्या देशाच्या विकासावरही होऊ शकतो असा इशाराही डॉ. काकोडकर यांनी दिला. युरोनियमचं प्रमाण जरी देशात कमी असलं तरी थोरिअमचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. ज्याच्यामुळे भविष्यात अणुइंधनासाठी आपल्याला इतर देशांवर अवलंबुन राहवे लागणार नाही. फुकुशिमामध्ये प्रेशर कमी करण्यासाठी रेडिएशन थोड्याप्रमाणात सोडावे लागले होते. मात्र त्याचा धोका नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2011 11:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close