S M L

बांगलादेशचा हॉलंडवर 6 गडी राखून विजय

14 मार्चवर्ल्ड कपमध्ये बांगलादेशने हॉलंडचा सहा विकेट राखून पराभव केला. या विजयाबरोबरच बांगलादेशने क्वार्टर फायनलमधले आपलं आव्हान कायम ठेवले आहे. हॉलंडने बांगलादेशसमोर विजयासाठी 161 रन्सचे माफक आव्हान ठेवले होते. बांगलादेशने हे आव्हान 6 विकेट आणि 52 बॉल्स राखून पूर्ण केलं. ओपनर इम्रुल कायसने सर्वाधिक 73 रन्स केले तर जुनैद सिद्धिकी आणि शहरयार नफिसनेही त्याला चांगली साथ दिली. त्याआधी टेन ड्युस्काटेच्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर हॉलंडने 150 रन्सचा टप्पा पार केला. पण त्याला इतर बॅट्समनची साथ मिळाली नाही. बांगलादेशतर्फे अब्दुर रझ्झाकने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 14, 2011 11:23 AM IST

बांगलादेशचा हॉलंडवर 6 गडी राखून विजय

14 मार्च

वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशने हॉलंडचा सहा विकेट राखून पराभव केला. या विजयाबरोबरच बांगलादेशने क्वार्टर फायनलमधले आपलं आव्हान कायम ठेवले आहे. हॉलंडने बांगलादेशसमोर विजयासाठी 161 रन्सचे माफक आव्हान ठेवले होते. बांगलादेशने हे आव्हान 6 विकेट आणि 52 बॉल्स राखून पूर्ण केलं. ओपनर इम्रुल कायसने सर्वाधिक 73 रन्स केले तर जुनैद सिद्धिकी आणि शहरयार नफिसनेही त्याला चांगली साथ दिली. त्याआधी टेन ड्युस्काटेच्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर हॉलंडने 150 रन्सचा टप्पा पार केला. पण त्याला इतर बॅट्समनची साथ मिळाली नाही. बांगलादेशतर्फे अब्दुर रझ्झाकने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2011 11:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close