S M L

नैसर्गिक आपत्तीचा भारताला धोका नाही - पंतप्रधान

14 मार्चजपानमध्ये त्सुनामीमुळे अणुप्रकल्पाची वाताहत झाली असली तरी अशाप्रकारची नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर भारताला त्याचा कुठलाही धोका नाही असा निर्वाळा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज दिला.जपानमध्ये भूकंप आणि सुनामीच्या तडाख्यानंतर आता अणुसंकट उभं राहिलंय. आतापर्यंत जपानमधल्या तीन अणुभट्‌ट्यांमध्ये स्फोट झाला. या स्फोटानंतर भारतातल्या अणुभट्‌ट्यांच्या सुरक्षिततेविषयी आणि नवीन प्रकल्पांविषयी जोरदार चर्चा सुरु झाली. मात्र आतापर्यंत घडलेल्या अपघातांची संख्या बघता भारतातील अणुप्रकल्प सुरक्षित असून त्याला कुठल्याही नैसर्गिक आपत्तींचा धोका नसल्याचा निर्वाळा पंतप्रधानांनी दिला. जपानमधल्या भूकंपानंतर जैतापूर अणुप्रकल्पाच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होताहेत. मात्र ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी हा प्रकल्प एकदम सुरक्षित असून झोन तीनमध्ये येतोय. त्सुनामी आल्यावरही या प्रकल्पाला काहीच धोका नाही असं काकोडकरांनी स्पष्ट केलंय. एवढं होऊनही अनेकांच्या मनात शंका मात्र कायम आहेत. देशातल्या अणुऊर्जा प्रकल्पात 1987 पासून आजपर्यंत सहा अपघात झालेत. त्यात सोडियम, आयोडिन आणि हेलियमच्या पदार्थांचा किरणोत्सर्ग झाला होता. परदेशातून मोठ्या प्रमाणात आयात करण्यात येणार्‍या अणुभट्यांसदर्भात भारतीय अणुशास्त्रज्ञ चिंता व्यक्त करताहेत. फ्रान्सच्या अरेवा कंपनीचं अणुतंत्रज्ञानावरही अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही. सध्या जपानमध्ये फुकुशिमा अणुप्रकल्पातील जनरल इलेक्ट्रीक कंपनीची अणुभट्टी थोड्या अधिक प्रमाणात वितळली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 14, 2011 06:03 PM IST

नैसर्गिक आपत्तीचा भारताला धोका नाही - पंतप्रधान

14 मार्च

जपानमध्ये त्सुनामीमुळे अणुप्रकल्पाची वाताहत झाली असली तरी अशाप्रकारची नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर भारताला त्याचा कुठलाही धोका नाही असा निर्वाळा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज दिला.

जपानमध्ये भूकंप आणि सुनामीच्या तडाख्यानंतर आता अणुसंकट उभं राहिलंय. आतापर्यंत जपानमधल्या तीन अणुभट्‌ट्यांमध्ये स्फोट झाला. या स्फोटानंतर भारतातल्या अणुभट्‌ट्यांच्या सुरक्षिततेविषयी आणि नवीन प्रकल्पांविषयी जोरदार चर्चा सुरु झाली. मात्र आतापर्यंत घडलेल्या अपघातांची संख्या बघता भारतातील अणुप्रकल्प सुरक्षित असून त्याला कुठल्याही नैसर्गिक आपत्तींचा धोका नसल्याचा निर्वाळा पंतप्रधानांनी दिला. जपानमधल्या भूकंपानंतर जैतापूर अणुप्रकल्पाच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होताहेत. मात्र ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी हा प्रकल्प एकदम सुरक्षित असून झोन तीनमध्ये येतोय. त्सुनामी आल्यावरही या प्रकल्पाला काहीच धोका नाही असं काकोडकरांनी स्पष्ट केलंय.

एवढं होऊनही अनेकांच्या मनात शंका मात्र कायम आहेत. देशातल्या अणुऊर्जा प्रकल्पात 1987 पासून आजपर्यंत सहा अपघात झालेत. त्यात सोडियम, आयोडिन आणि हेलियमच्या पदार्थांचा किरणोत्सर्ग झाला होता. परदेशातून मोठ्या प्रमाणात आयात करण्यात येणार्‍या अणुभट्यांसदर्भात भारतीय अणुशास्त्रज्ञ चिंता व्यक्त करताहेत. फ्रान्सच्या अरेवा कंपनीचं अणुतंत्रज्ञानावरही अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही. सध्या जपानमध्ये फुकुशिमा अणुप्रकल्पातील जनरल इलेक्ट्रीक कंपनीची अणुभट्टी थोड्या अधिक प्रमाणात वितळली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2011 06:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close