S M L

थॉमस प्रकरणावरुन दोनदा विधानसभा तहकूब ; अखेर कामकाजाला सुरूवात

16 मार्चबजेट अधिवेशनाच्या तिसर्‍या दिवशी दोनदा सभा तहकूब झाल्यानंतर विधानसभेचं कामकाज अखेर सुरु झालंय. यासंदर्भात सभा अध्यक्षांनी निर्देश दिले आहे. ज्या दिवशी मुख्यमंत्री विधानपरिषदेत निवेदन करतील त्याच दिवशी विधानसभेत करतील आणि विधानसभेत आधीच करतील' असं सभा अध्यक्षांनी सांगितल्यानंतर कामकाजाला सुरुवात झाली. आज बुधवारी सकाळपासूनच पी. जे. थॉमस यांच्या नियुक्तीचं प्रकरण गाजतं होतं. विरोधकांच्या गदारोळामुळे विधानसभेचं कामकाज सकाळपासून दोनदा तहकूब करण्यात आलं होतं. संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी याबाबत विधानसभेत निवेदन दिलं. तसेच 'मुख्यमंत्री योग्यवेळी निवेदन करतील' असंही त्यांनी सांगितले होते. पण विरोधी पक्षनेत्यांना पाटील यांचं स्पष्टीकरण मान्य नसल्याने त्यांनी विरोध केला. मुख्यमंत्र्यांनी आजच निवेदन सादर करावे अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. मात्र अखेर सभाध्यक्षांच्या निर्देशानंतर कामकाजाला सुरुवात झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 16, 2011 09:27 AM IST

थॉमस प्रकरणावरुन दोनदा विधानसभा तहकूब ; अखेर कामकाजाला सुरूवात

16 मार्च

बजेट अधिवेशनाच्या तिसर्‍या दिवशी दोनदा सभा तहकूब झाल्यानंतर विधानसभेचं कामकाज अखेर सुरु झालंय. यासंदर्भात सभा अध्यक्षांनी निर्देश दिले आहे. ज्या दिवशी मुख्यमंत्री विधानपरिषदेत निवेदन करतील त्याच दिवशी विधानसभेत करतील आणि विधानसभेत आधीच करतील' असं सभा अध्यक्षांनी सांगितल्यानंतर कामकाजाला सुरुवात झाली. आज बुधवारी सकाळपासूनच पी. जे. थॉमस यांच्या नियुक्तीचं प्रकरण गाजतं होतं. विरोधकांच्या गदारोळामुळे विधानसभेचं कामकाज सकाळपासून दोनदा तहकूब करण्यात आलं होतं. संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी याबाबत विधानसभेत निवेदन दिलं. तसेच 'मुख्यमंत्री योग्यवेळी निवेदन करतील' असंही त्यांनी सांगितले होते. पण विरोधी पक्षनेत्यांना पाटील यांचं स्पष्टीकरण मान्य नसल्याने त्यांनी विरोध केला. मुख्यमंत्र्यांनी आजच निवेदन सादर करावे अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. मात्र अखेर सभाध्यक्षांच्या निर्देशानंतर कामकाजाला सुरुवात झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2011 09:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close