S M L

आयुष्य जेव्हा मृत्यूच्या दाराशी येऊन ठेपते...

अलका धुपकर, मुंबई16 मार्चअरुणा शानबागच्या केसने देशात मृत्यूसंदर्भातली खुली चर्चा सुरु झाली. पण आयुष्य जेव्हा मृत्यूच्या दाराशी येऊन ठेपते त्या टप्प्यावर आपली काळजी घेणारं, मायेनं सांभाळ करणारं असं कुणीही नसेल तर ते आयुष्य किती भयाण बनते याचे एक उदाहरण याच काळात केईएम हॉस्पिटलने जवळून बघितलेय. अरुणा तर केईएमची नर्स आहे. पण 73 वर्षांच्या पार्किन्सनं या पेशंटचे कुणीच नातलग त्यांचा सांभाळ करायला तयार नाही आहेत.केईएम हॉस्पिटलच्या वॉर्ड नंबर दहामध्ये चार बाय सहाच्या बेडवर आराम करणारे अरुण नाटेकर पार्किन्सनचे पेशंट तेअविवाहित असल्याने स्वत:चं कुटुंब नाही. आणि या टप्प्यावर एकटेपणाने घेरलेले आयुष्य.अरुण नाटेकर हे मुंबईत जन्मलेले आणि रुईयामध्ये त्यांनी बीएस्सी केलेले आहे. अख्खं आयुष्य त्यांनी ऑपेरा हाऊसमध्ये काम केले स्पेअर पार्ट्सचे सप्लायर म्हणून आयुष्य मोठं थाटात जगलो असं नाटेकर आजोबा अभिमानाने सांगतात. 4 फेब्रुवारी 2011 ला रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत नाटेकर यांना केईएममध्ये दाखल करण्यात आले. मृत्यू येऊन उभा ठाकला हे कळत असले तरी आयुष्य स्वत:हून थांबवावं हे नाटेकर यांना मंजूर नाही . अरुण नाटेकर यांच्या कुटुंबीयांचा पोलीस कसून शोध घेत आहे. पण माणुसकीचा धर्म न मानणारे नाटेकर यांचे नातलग कायद्याच्या बडग्याला तरी जुमानतील का? ठाऊक नाही...

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 16, 2011 03:53 PM IST

आयुष्य जेव्हा मृत्यूच्या दाराशी येऊन ठेपते...

अलका धुपकर, मुंबई

16 मार्च

अरुणा शानबागच्या केसने देशात मृत्यूसंदर्भातली खुली चर्चा सुरु झाली. पण आयुष्य जेव्हा मृत्यूच्या दाराशी येऊन ठेपते त्या टप्प्यावर आपली काळजी घेणारं, मायेनं सांभाळ करणारं असं कुणीही नसेल तर ते आयुष्य किती भयाण बनते याचे एक उदाहरण याच काळात केईएम हॉस्पिटलने जवळून बघितलेय. अरुणा तर केईएमची नर्स आहे. पण 73 वर्षांच्या पार्किन्सनं या पेशंटचे कुणीच नातलग त्यांचा सांभाळ करायला तयार नाही आहेत.

केईएम हॉस्पिटलच्या वॉर्ड नंबर दहामध्ये चार बाय सहाच्या बेडवर आराम करणारे अरुण नाटेकर पार्किन्सनचे पेशंट तेअविवाहित असल्याने स्वत:चं कुटुंब नाही. आणि या टप्प्यावर एकटेपणाने घेरलेले आयुष्य.

अरुण नाटेकर हे मुंबईत जन्मलेले आणि रुईयामध्ये त्यांनी बीएस्सी केलेले आहे. अख्खं आयुष्य त्यांनी ऑपेरा हाऊसमध्ये काम केले स्पेअर पार्ट्सचे सप्लायर म्हणून आयुष्य मोठं थाटात जगलो असं नाटेकर आजोबा अभिमानाने सांगतात.

4 फेब्रुवारी 2011 ला रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत नाटेकर यांना केईएममध्ये दाखल करण्यात आले. मृत्यू येऊन उभा ठाकला हे कळत असले तरी आयुष्य स्वत:हून थांबवावं हे नाटेकर यांना मंजूर नाही . अरुण नाटेकर यांच्या कुटुंबीयांचा पोलीस कसून शोध घेत आहे. पण माणुसकीचा धर्म न मानणारे नाटेकर यांचे नातलग कायद्याच्या बडग्याला तरी जुमानतील का? ठाऊक नाही...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2011 03:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close