S M L

पावनगडावर रोप वेला इतिहासप्रेमींचा आक्षेप

16 मार्चप्रताप नाईक, पावनगडकोल्हापूरजवळच्या पावनगडावर रोप वे बांधण्याचा प्रकल्प सुरू होत आहे. ज्योतिबापासून अवघ्या अर्ध्या तासावर असणार्‍या या किल्यावर जाण्यासाठी रस्ता आहे. तरीही व्यापारीकरणाच्या उद्देशाने हा रोप वे बांधला जातोय, असा पर्यावरणतज्ज्ञ आणि इतिहासप्रेमींचा आक्षेप आहे. ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या पावनगडावर रोप वे बांधण्याचा घाट घातला जातोय. तात्यासाहेब कोरे सहकारी दूधसाखर वाहतूक संस्था हा रोपवे बांधणार आहे. हा रोपवे तयार झाला तर इथली शांतता भंग पावणार आहे. इतकचं नव्हे तर किल्याला आणि इथल्या जैवविविधतेला धोका पोहोचणार आहे. पुरातत्व विभागाने या किल्ल्याला कशी एनओसी दिली असा सवाल इतिहासप्रेमी इंद्रजीत सावंत यांनी विचारला आहे. रोप वे प्रकल्पासाठी पावनगड परिसराची जी जागा नक्की केलीय ते वनक्षेत्र आहे. आणि हा भाग पश्चिम घाटाला जोडलेला आहे. हा भाग जैवविविधतेनंही समृद्ध आणि अतिसंवेदनशील आहे. त्यामुळे निसर्ग अभ्यासका अनिल चौगुले यांनी याला आक्षेप घेतला आहे. हा रोप वे तयार व्हावा यासाठी एकीक डे जोरदार प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे प्रकल्पाच्या विरोधातील वातावरणही तापू लागले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 16, 2011 09:10 AM IST

पावनगडावर रोप वेला इतिहासप्रेमींचा आक्षेप

16 मार्च

प्रताप नाईक, पावनगड

कोल्हापूरजवळच्या पावनगडावर रोप वे बांधण्याचा प्रकल्प सुरू होत आहे. ज्योतिबापासून अवघ्या अर्ध्या तासावर असणार्‍या या किल्यावर जाण्यासाठी रस्ता आहे. तरीही व्यापारीकरणाच्या उद्देशाने हा रोप वे बांधला जातोय, असा पर्यावरणतज्ज्ञ आणि इतिहासप्रेमींचा आक्षेप आहे.

ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या पावनगडावर रोप वे बांधण्याचा घाट घातला जातोय. तात्यासाहेब कोरे सहकारी दूधसाखर वाहतूक संस्था हा रोपवे बांधणार आहे. हा रोपवे तयार झाला तर इथली शांतता भंग पावणार आहे. इतकचं नव्हे तर किल्याला आणि इथल्या जैवविविधतेला धोका पोहोचणार आहे. पुरातत्व विभागाने या किल्ल्याला कशी एनओसी दिली असा सवाल इतिहासप्रेमी इंद्रजीत सावंत यांनी विचारला आहे.

रोप वे प्रकल्पासाठी पावनगड परिसराची जी जागा नक्की केलीय ते वनक्षेत्र आहे. आणि हा भाग पश्चिम घाटाला जोडलेला आहे. हा भाग जैवविविधतेनंही समृद्ध आणि अतिसंवेदनशील आहे. त्यामुळे निसर्ग अभ्यासका अनिल चौगुले यांनी याला आक्षेप घेतला आहे. हा रोप वे तयार व्हावा यासाठी एकीक डे जोरदार प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे प्रकल्पाच्या विरोधातील वातावरणही तापू लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2011 09:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close