S M L

ए राजा यांच्या विरोधात आरोपपत्र 31 मार्चपर्यंत दाखल

16 मार्चटू जी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने सुप्रीम कोर्टात आज स्टेटस रिपोर्ट सादर केला. माजी दूरसंचार मंत्री ए राजा यांच्याविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. दिलेल्या मुदतीत घोटाळ्याचा तपास पूर्ण होईल असा विश्वास सीबीआयने व्यक्त केला. 31 मार्चपर्यंत ए राजा आणि दोन दूरसंचार कंपन्यांविरोधात चार्जशीट दाखल केलं जाणार असल्याचंही सीबीआयनं सांगितलं. काही टेलिकॉम कंपन्यांचे चीनशी संबंध असल्याचा दावाही सीबीआयने केला. तपासाचा अंतिम स्टेटस रिपोर्ट सीबीआय 29 मार्चपूर्वी सादर करणार आहे. दरम्यान सीबीआयने या घोटाळ्याप्रकरणी ऍटर्नी जनरल गुलाम वहानवटी यांचीही गेल्या आठवड्यात चौकशी केली. वहानवटी सॉलिसिटर जनरल असताना राजा यांना दिलेल्या कायदेशीर सल्ल्याबद्दल ही विचारणा करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 16, 2011 06:12 PM IST

ए राजा यांच्या विरोधात आरोपपत्र 31 मार्चपर्यंत दाखल

16 मार्च

टू जी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने सुप्रीम कोर्टात आज स्टेटस रिपोर्ट सादर केला. माजी दूरसंचार मंत्री ए राजा यांच्याविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. दिलेल्या मुदतीत घोटाळ्याचा तपास पूर्ण होईल असा विश्वास सीबीआयने व्यक्त केला. 31 मार्चपर्यंत ए राजा आणि दोन दूरसंचार कंपन्यांविरोधात चार्जशीट दाखल केलं जाणार असल्याचंही सीबीआयनं सांगितलं. काही टेलिकॉम कंपन्यांचे चीनशी संबंध असल्याचा दावाही सीबीआयने केला. तपासाचा अंतिम स्टेटस रिपोर्ट सीबीआय 29 मार्चपूर्वी सादर करणार आहे. दरम्यान सीबीआयने या घोटाळ्याप्रकरणी ऍटर्नी जनरल गुलाम वहानवटी यांचीही गेल्या आठवड्यात चौकशी केली. वहानवटी सॉलिसिटर जनरल असताना राजा यांना दिलेल्या कायदेशीर सल्ल्याबद्दल ही विचारणा करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2011 06:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close