S M L

शीखा अवस्थी ठरली पहिली 'सोर्ड ऑफ ऑनर'

17 मार्चभारतीय सशस्त्र दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच सोर्ड ऑफ ऑनर हा किताब महिला कॅडेटला दिला जाणार आहे. आणि या किताबाची ऐतिहासिक मानकरी ठरलीय मेडिकल कॅडेट शीखा अवस्थी. शीखा ही पहिली महिला डॉक्टर आहे जी या किताबाने सन्मानित केली जाणार आहे.आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजची ती पहिली पदवीधर आहे जिला तिन्ही सर्वश्रेष्ठ पदकांनी सन्मानित केलं जाईल. सोर्ड ऑफ ऑनर, प्रेसीडेंट गोल्ड मेडल आणि कलिंगा ट्रॉफीचा यात समावेश आहे. 18 मार्चला होणार्‍या परेडमध्ये ही पदकं तिला दिली जातील.शीखा अवस्थी ही मूळची उत्तरप्रदेशमधील राय बरेली इथली आहे. 2006 मध्ये तिने एफएमसी जॉईन केलं. आणि तेव्हापासून एफएमसीच्या अभ्यासक्रमात तिने चमकदार कामगिरी सातत्यपूर्ण कायम ठेवली. 12 विषयात तिने डिस्टिंक्शन मिळवलीय, एफएमसीमध्ये 20 पुरस्कारांची ती मानकरी ठरलीय. एमबीबीएसच्या सर्व परीक्षात ती पहिली आली आहेत. सैन्यदलात भरती होणं हे शीखाचं स्वप्न आहे आणि हे स्वप्न पाहताना कर्नल माधुरी कानिटकर आपला आदर्श असल्याचं ती आवर्जून सांगते. अभ्यासक्रमात केलेली चमकदार कामगिरी सैन्यात दाखल झाल्यानंतर प्रत्यक्ष वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून सार्थ करण्याचा शीखाचा निर्धार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 17, 2011 02:22 PM IST

शीखा अवस्थी ठरली पहिली 'सोर्ड ऑफ ऑनर'

17 मार्च

भारतीय सशस्त्र दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच सोर्ड ऑफ ऑनर हा किताब महिला कॅडेटला दिला जाणार आहे. आणि या किताबाची ऐतिहासिक मानकरी ठरलीय मेडिकल कॅडेट शीखा अवस्थी. शीखा ही पहिली महिला डॉक्टर आहे जी या किताबाने सन्मानित केली जाणार आहे.आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजची ती पहिली पदवीधर आहे जिला तिन्ही सर्वश्रेष्ठ पदकांनी सन्मानित केलं जाईल. सोर्ड ऑफ ऑनर, प्रेसीडेंट गोल्ड मेडल आणि कलिंगा ट्रॉफीचा यात समावेश आहे. 18 मार्चला होणार्‍या परेडमध्ये ही पदकं तिला दिली जातील.

शीखा अवस्थी ही मूळची उत्तरप्रदेशमधील राय बरेली इथली आहे. 2006 मध्ये तिने एफएमसी जॉईन केलं. आणि तेव्हापासून एफएमसीच्या अभ्यासक्रमात तिने चमकदार कामगिरी सातत्यपूर्ण कायम ठेवली. 12 विषयात तिने डिस्टिंक्शन मिळवलीय, एफएमसीमध्ये 20 पुरस्कारांची ती मानकरी ठरलीय. एमबीबीएसच्या सर्व परीक्षात ती पहिली आली आहेत. सैन्यदलात भरती होणं हे शीखाचं स्वप्न आहे आणि हे स्वप्न पाहताना कर्नल माधुरी कानिटकर आपला आदर्श असल्याचं ती आवर्जून सांगते. अभ्यासक्रमात केलेली चमकदार कामगिरी सैन्यात दाखल झाल्यानंतर प्रत्यक्ष वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून सार्थ करण्याचा शीखाचा निर्धार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2011 02:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close