S M L

मराठी शाळांना मान्यता मंजूर करण्याची मागणी

18 मार्च'मराठी शाळा टिकू द्या, मराठी भाषेतून शिकू द्या' असा नारा देत मराठी शाळा बचाव आंदोलनानं 21 मार्चला पुण्यात शिक्षण संचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. अधिवेशनाच्याच काळात मराठी शाळांच्या रोखून धरलेल्या मान्यता सरकारने मंजूर कराव्यात अशी मागणी यानिमित्ताने करण्यात आली. त्यासाठी आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे योग्य तो पाठपुरावाही केला जाईल असं दीपक पवार, अरुण ठाकूर, विजया चौहान यांनी जाहीर केलं. 2008 पासून राज्यात सुरु असलेल्या मराठी शाळांच्या मान्यतेचा प्रश्न गाजतोय. या मराठी शाळांना सरकार एक तर मान्यता देत नाही आणि दुसरीकडे, या शाळांच्या संस्थाचालकांवर बेकायदेशीर ठरवून कारवाई केली जातेय. याविरोधात पत्रकार परिषदेतून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शिक्षण हक्क समन्वय समिती आणि मराठी भाषा अभ्यास केंद्र यासाठी लढा देत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 18, 2011 12:39 PM IST

मराठी शाळांना मान्यता मंजूर करण्याची मागणी

18 मार्च

'मराठी शाळा टिकू द्या, मराठी भाषेतून शिकू द्या' असा नारा देत मराठी शाळा बचाव आंदोलनानं 21 मार्चला पुण्यात शिक्षण संचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

अधिवेशनाच्याच काळात मराठी शाळांच्या रोखून धरलेल्या मान्यता सरकारने मंजूर कराव्यात अशी मागणी यानिमित्ताने करण्यात आली. त्यासाठी आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे योग्य तो पाठपुरावाही केला जाईल असं दीपक पवार, अरुण ठाकूर, विजया चौहान यांनी जाहीर केलं.

2008 पासून राज्यात सुरु असलेल्या मराठी शाळांच्या मान्यतेचा प्रश्न गाजतोय. या मराठी शाळांना सरकार एक तर मान्यता देत नाही आणि दुसरीकडे, या शाळांच्या संस्थाचालकांवर बेकायदेशीर ठरवून कारवाई केली जातेय. याविरोधात पत्रकार परिषदेतून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शिक्षण हक्क समन्वय समिती आणि मराठी भाषा अभ्यास केंद्र यासाठी लढा देत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 18, 2011 12:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close