S M L

पुण्यात रामोशी वतन प्रकरणी भाजपाचे धरणं आंदोलन

18 मार्चपुण्यातील 102 एकर रामोशी वतन जमीन गैरव्यावहार प्रकरणी दोषी आरोंपीवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी तसेच सर्व जमिनीचा सात बारा कोरा करून जमिनीचा ताबा त्या भागात राहत असलेल्या हजारो कुटुंबांना द्यावा या मागणीकरता भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन केलं. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या जमिनीच्या फेरफाराचे आदेश दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केला होता. काही दिवसांपूर्वी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक रवी बर्‍हाटे यांच्या तक्रारीवरून पुणे महानगरपालिकेच्या मालकीच्या 24 एकर जमिनीची खाजगी मालमत्ता म्हणून झालेली नोंद रद्द करावी असं पत्र पुणे महापालिकेनं महसूल विभागाला दिलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 18, 2011 04:40 PM IST

पुण्यात रामोशी वतन प्रकरणी भाजपाचे धरणं आंदोलन

18 मार्च

पुण्यातील 102 एकर रामोशी वतन जमीन गैरव्यावहार प्रकरणी दोषी आरोंपीवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी तसेच सर्व जमिनीचा सात बारा कोरा करून जमिनीचा ताबा त्या भागात राहत असलेल्या हजारो कुटुंबांना द्यावा या मागणीकरता भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन केलं.

तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या जमिनीच्या फेरफाराचे आदेश दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केला होता. काही दिवसांपूर्वी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक रवी बर्‍हाटे यांच्या तक्रारीवरून पुणे महानगरपालिकेच्या मालकीच्या 24 एकर जमिनीची खाजगी मालमत्ता म्हणून झालेली नोंद रद्द करावी असं पत्र पुणे महापालिकेनं महसूल विभागाला दिलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 18, 2011 04:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close