S M L

रंगाचे फुगे फेकाल तर जन्मठेप भोगावी लागणार

19 मार्चदेशभरात आज होळी उत्साहात साजरी होतेय. मुंबईमध्येही हा आनंद मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मुंबईत विशेषतः लोकलमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना मात्र होळी साजरी करणार्‍यांच्या अतिउत्साहाचा फटका सहन करावा लागतो. रंगाचे फुगे मारण्याच्या प्रकारामुळे अनेक नागरिक त्रासून जातात. यंदा यावर्षी अशा अतिउत्साही मंडळींवर रेल्वे पोलिसांनी करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी रंगपंचमीला लोकलवर फुगे फेकण्याचे प्रकार घडतात. पण यंदा असे फुगे फेकणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. आणि फुगे फेकण्यानं जर कोणाला इजा झाली तर त्याला जन्मठेपेची शिक्षा मिळावी यासाठीही रेल्वे पोलीस कसून प्रयत्न करणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 19, 2011 09:52 AM IST

रंगाचे फुगे फेकाल तर जन्मठेप भोगावी लागणार

19 मार्च

देशभरात आज होळी उत्साहात साजरी होतेय. मुंबईमध्येही हा आनंद मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मुंबईत विशेषतः लोकलमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना मात्र होळी साजरी करणार्‍यांच्या अतिउत्साहाचा फटका सहन करावा लागतो. रंगाचे फुगे मारण्याच्या प्रकारामुळे अनेक नागरिक त्रासून जातात. यंदा यावर्षी अशा अतिउत्साही मंडळींवर रेल्वे पोलिसांनी करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी रंगपंचमीला लोकलवर फुगे फेकण्याचे प्रकार घडतात. पण यंदा असे फुगे फेकणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. आणि फुगे फेकण्यानं जर कोणाला इजा झाली तर त्याला जन्मठेपेची शिक्षा मिळावी यासाठीही रेल्वे पोलीस कसून प्रयत्न करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2011 09:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close