S M L

'काठीने' मारुन होळी होते साजरी

मनोज जयस्वाल, वाशिम 19 मार्चबंजारा समाजाचा होळी सण वैशिष्ट्यपूर्ण म्हणून ओळखला जातो. बंजारा समाज आजही पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी करतात. नातेवाईकांपैकी एका व्यक्तीला काठीनं मारुन फाग मागितला जातो. पण तोही हसत खेळत. होळी पोर्णिमा ते गुढीपाडवा या पंधरवड्यात ही होळी साजरी केली जाते. वसंत ऋतूत पळस बहरतो आणि आठवण होते ती होळी सणाची. सप्तरंगाची उधळण करत होळी सण येतो... देशात होळी साजरी करण्याची पद्धत वेगवेगळी दिसते. पण बंजारा समाजाची होळी आजही कुतूहलाचा विषय आहे. सूर्योदयापूर्वी पारंपरिक गाण्यांच्या तालावर पाय थिरकतात. आणि सुरु होते बंजारा बांधवांची होळी. याच दिवसांत तरुण - तरुणी नव्या जीवनाला सुरुवात करतात. बंजारा समाजात होळीच्या दिवशी फाग मागण्याची प्रथा आहे. नातेवाईकांपैकी एका व्यक्तीला काठीनं मारुन फाग मागितला जातो. पण तोही हसत खेळत. भांडण तंटा मिटवण्यासाठी हा सण बंजारा समाजात महत्वाचा मानला जातो. होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर शहरात डिजे आणि सालसाच्या तालावर लोकं बेधुंद होतात. पण बंजारा समाजाच्या होळीचं सांस्कृतिक वेगऴेपण अजूनही कायम आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 19, 2011 10:57 AM IST

'काठीने' मारुन होळी होते साजरी

मनोज जयस्वाल, वाशिम

19 मार्च

बंजारा समाजाचा होळी सण वैशिष्ट्यपूर्ण म्हणून ओळखला जातो. बंजारा समाज आजही पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी करतात. नातेवाईकांपैकी एका व्यक्तीला काठीनं मारुन फाग मागितला जातो. पण तोही हसत खेळत. होळी पोर्णिमा ते गुढीपाडवा या पंधरवड्यात ही होळी साजरी केली जाते.

वसंत ऋतूत पळस बहरतो आणि आठवण होते ती होळी सणाची. सप्तरंगाची उधळण करत होळी सण येतो... देशात होळी साजरी करण्याची पद्धत वेगवेगळी दिसते. पण बंजारा समाजाची होळी आजही कुतूहलाचा विषय आहे. सूर्योदयापूर्वी पारंपरिक गाण्यांच्या तालावर पाय थिरकतात. आणि सुरु होते बंजारा बांधवांची होळी. याच दिवसांत तरुण - तरुणी नव्या जीवनाला सुरुवात करतात.

बंजारा समाजात होळीच्या दिवशी फाग मागण्याची प्रथा आहे. नातेवाईकांपैकी एका व्यक्तीला काठीनं मारुन फाग मागितला जातो. पण तोही हसत खेळत. भांडण तंटा मिटवण्यासाठी हा सण बंजारा समाजात महत्वाचा मानला जातो. होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर शहरात डिजे आणि सालसाच्या तालावर लोकं बेधुंद होतात. पण बंजारा समाजाच्या होळीचं सांस्कृतिक वेगऴेपण अजूनही कायम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2011 10:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close