S M L

होळी रे होळी खान्देशातील पुरणाची पोळी

20 मार्चहोळीचं खान्देशातील खास वैशिष्ट्य म्हणजे खापरावरील पुरणपोळी. आजही खान्देशातला हा आवडता खाद्य पदार्थ आहे. हरभरा अर्थात चणा डाळीत खास गुळ आणि इलायची एकत्र करून शिजवल्यानंतर खास पुरण तयार होतं. त्यानंतर तयारी सुरू होते ती पोळीची. या पोळीसाठी मीठ टाकून गव्हाच्या पीठाची कणीक मळतात. या तयार कणकेच्या 2 गोळ्यांमध्ये पुरणाचा गोळा टाकल्यानंतर त्याचा आकार पाहिजे तसा मोठा करता येतो. पण ही पोळी भाजण्यासाठी तवा नाही वापरत तर माठ अर्थात खापर उलटं करुन त्या खाली विस्तव पेटवला जातो. खापर जितकं मोठं तितकीच मोठी ही खापरावरची पुरणपोळी. या पोळीसोबत आमटी किंवा आंब्यांचा रस असेल तर त्याची लज्जत आणखी वाढते.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 20, 2011 11:06 AM IST

होळी रे होळी खान्देशातील पुरणाची पोळी

20 मार्च

होळीचं खान्देशातील खास वैशिष्ट्य म्हणजे खापरावरील पुरणपोळी. आजही खान्देशातला हा आवडता खाद्य पदार्थ आहे. हरभरा अर्थात चणा डाळीत खास गुळ आणि इलायची एकत्र करून शिजवल्यानंतर खास पुरण तयार होतं. त्यानंतर तयारी सुरू होते ती पोळीची. या पोळीसाठी मीठ टाकून गव्हाच्या पीठाची कणीक मळतात. या तयार कणकेच्या 2 गोळ्यांमध्ये पुरणाचा गोळा टाकल्यानंतर त्याचा आकार पाहिजे तसा मोठा करता येतो. पण ही पोळी भाजण्यासाठी तवा नाही वापरत तर माठ अर्थात खापर उलटं करुन त्या खाली विस्तव पेटवला जातो. खापर जितकं मोठं तितकीच मोठी ही खापरावरची पुरणपोळी. या पोळीसोबत आमटी किंवा आंब्यांचा रस असेल तर त्याची लज्जत आणखी वाढते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2011 11:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close