S M L

जावई बापूंची गाढवावरून मिरवणूक

20 मार्चविविध मागण्या घेऊन अट्टाहास करणारे जावई आपल्याला पहावयास मिळतात. सासरच्या मंडळीकडून त्याचे हट्टही पुरविण्यात येतात. मात्र बीड जिल्ह्यातील विडा इथं जावायाला धुलीवंदनाच्या दिवशी चक्क गाढवावर बसवून त्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते. विडाकरांची ही अनोखी परंपरा गेल्या 75 वर्षांपासून सुरु आहे. जावयाची गाढवावर धिंड काढण्याची परंपरा जहागिरदार आनंदराव देशमुखांनी सुरु केल्याचं येथे सांगितले जाते. साडेसात हजार लोकसंख्या असलेल्या या गावात 150 घरजावई आहेत. धुलीवंदनाच्या आधी दोन दिवसापासून यांना शोधण्याची सुरुवात होते. यंदा गाढवावर बसायचा मान रामकिसन जाधव यांना मिळाला. गाढवावर बसून जावयाची मिरवणूक पूर्ण गावभर काढली जाते. तब्बल पाच तास ही मिरवणूक चालते, नंतर मारुतीच्या मंदिरासमोर येऊन जावयाला नवीन कपड्याचा आहेर देण्याची प्रथा आहे. एकदा गाढवावर बसविलेल्या जावयाला परत दुसर्‍यांदा गाढवावर बसविले जात नाही. विशेष म्हणजे गाढवावर बसणारा जावई सुध्दा उत्साहानं गाढवावर बसलेला असतो.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 20, 2011 02:56 PM IST

जावई बापूंची गाढवावरून मिरवणूक

20 मार्च

विविध मागण्या घेऊन अट्टाहास करणारे जावई आपल्याला पहावयास मिळतात. सासरच्या मंडळीकडून त्याचे हट्टही पुरविण्यात येतात. मात्र बीड जिल्ह्यातील विडा इथं जावायाला धुलीवंदनाच्या दिवशी चक्क गाढवावर बसवून त्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते. विडाकरांची ही अनोखी परंपरा गेल्या 75 वर्षांपासून सुरु आहे.

जावयाची गाढवावर धिंड काढण्याची परंपरा जहागिरदार आनंदराव देशमुखांनी सुरु केल्याचं येथे सांगितले जाते. साडेसात हजार लोकसंख्या असलेल्या या गावात 150 घरजावई आहेत. धुलीवंदनाच्या आधी दोन दिवसापासून यांना शोधण्याची सुरुवात होते. यंदा गाढवावर बसायचा मान रामकिसन जाधव यांना मिळाला.

गाढवावर बसून जावयाची मिरवणूक पूर्ण गावभर काढली जाते. तब्बल पाच तास ही मिरवणूक चालते, नंतर मारुतीच्या मंदिरासमोर येऊन जावयाला नवीन कपड्याचा आहेर देण्याची प्रथा आहे. एकदा गाढवावर बसविलेल्या जावयाला परत दुसर्‍यांदा गाढवावर बसविले जात नाही. विशेष म्हणजे गाढवावर बसणारा जावई सुध्दा उत्साहानं गाढवावर बसलेला असतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2011 02:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close