S M L

लिबियावर हवाई हल्ल्यात 48 जण ठार !

20 मार्चअमेरिका आणि इतर देशांनी ताकीद देऊनही गद्दाफिंनी संहार सुरूच ठेवला. वेंगाझीच्या पूर्वोत्तर शहरावर गद्दाफींच्या फौजांचा बॉम्बवर्षाव सुरूच आहे. या हल्ल्यात 48 जणांचा मृत्यू झाल्याचं सूत्रांनी सांगितले. अमेरिकेनंही लिबियामध्ये 20 ठिकाणी 110 टॉमहॉक मिसाईलचा मारा केला. पेंटागॉनने दिलेल्या माहितीनुसार अनेक देश मिळून आता कारवाई करणार असून ही फक्त सुरूवात आहे. दरम्यान ब्रिटननंही आपली चार लढाऊ विमानं लिबियाच्या दिशेनं पाठवल्याचं समजतंय तर फ्रान्सच्या लढाऊ विमानांनी काही रनगाडे आणि शस्त्रवाहून नेणारी वाहनं उध्वस्त केली आहेत. दरम्यान स्पेन,इटली, कॅनडा आणि नेदरलँड या चार देशांनीही आता लिबियाविरोधातील कारवाई सक्रीय सहभाग घेतल्याचं अमेरिकेनं स्पष्ट केलंय. दरम्यान भारतान यासर्व प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. लिबियावर होणार्‍या हवाई हल्ल्यांचा भारताने निषेध केला आहे. तसेच लिबियातील परिस्थिती सुधारण्यासाठी विचारपूर्वक पावलं उचलण्याची गरज आहे. नाही तर आधीच संकटात अकडलेल्या लिबियातील जनतेपुढच्या अडचणी अजून वाढतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 20, 2011 06:02 PM IST

लिबियावर हवाई हल्ल्यात 48 जण ठार !

20 मार्च

अमेरिका आणि इतर देशांनी ताकीद देऊनही गद्दाफिंनी संहार सुरूच ठेवला. वेंगाझीच्या पूर्वोत्तर शहरावर गद्दाफींच्या फौजांचा बॉम्बवर्षाव सुरूच आहे. या हल्ल्यात 48 जणांचा मृत्यू झाल्याचं सूत्रांनी सांगितले. अमेरिकेनंही लिबियामध्ये 20 ठिकाणी 110 टॉमहॉक मिसाईलचा मारा केला. पेंटागॉनने दिलेल्या माहितीनुसार अनेक देश मिळून आता कारवाई करणार असून ही फक्त सुरूवात आहे. दरम्यान ब्रिटननंही आपली चार लढाऊ विमानं लिबियाच्या दिशेनं पाठवल्याचं समजतंय तर फ्रान्सच्या लढाऊ विमानांनी काही रनगाडे आणि शस्त्रवाहून नेणारी वाहनं उध्वस्त केली आहेत. दरम्यान स्पेन,इटली, कॅनडा आणि नेदरलँड या चार देशांनीही आता लिबियाविरोधातील कारवाई सक्रीय सहभाग घेतल्याचं अमेरिकेनं स्पष्ट केलंय.

दरम्यान भारतान यासर्व प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. लिबियावर होणार्‍या हवाई हल्ल्यांचा भारताने निषेध केला आहे. तसेच लिबियातील परिस्थिती सुधारण्यासाठी विचारपूर्वक पावलं उचलण्याची गरज आहे. नाही तर आधीच संकटात अकडलेल्या लिबियातील जनतेपुढच्या अडचणी अजून वाढतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2011 06:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close