S M L

गद्दाफींच्या निवासस्थानाजवळ हल्ला

21 मार्चलिबियाचे अध्यक्ष गद्दाफी यांच्या निवासस्थानाजवळ मिसाईल हल्ला करण्यात आला. येथील एक बिल्डिंगही नष्ट करण्यात आली. याच ठिकाणाहून लिबियातील सगळ्या हालचाली होत असल्याचा अमेरिकेचा दावा आहे. तसेच गद्दाफी हे आपलं टार्गेट नसून त्यांचं लष्कर आणि हवाई यंत्रणा नष्ट करणे आपले उद्दीष्ट असल्याचे अमेरिकेनं म्हंटलंय.अमेरिका आणि इतर देशांनी ताकीद देऊनही गद्दाफींनी संहार सुरूच ठेवला. बेंगाझीच्या पूर्वोत्तर शहरावर गद्दाफींच्या फौजांचा बॉम्बवर्षाव सुरूच आहे. अमेरिकेनंही लिबियामध्ये 20 ठिकाणी 110 टॉमहॉक मिसाईलचा मारा केला. दरम्यान ब्रिटननंही आपली चार लढाऊ विमाने लिबियाच्या दिशेने पाठवल्याचे समजतंय तर फ्रान्सच्या लढाऊ विमानांनी काही रनगाडे आणि शस्त्रवाहून नेणारी वाहनं उध्वस्त केली आहेत. दरम्यान स्पेन,इटली, कॅनडा आणि नेदरलँड या चार देशांनीही आता लिबियाविरोधातल्या कारवाईत सक्रीय सहभाग घेतल्याचं अमेरिकेने स्पष्ट केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 21, 2011 08:57 AM IST

गद्दाफींच्या निवासस्थानाजवळ हल्ला

21 मार्च

लिबियाचे अध्यक्ष गद्दाफी यांच्या निवासस्थानाजवळ मिसाईल हल्ला करण्यात आला. येथील एक बिल्डिंगही नष्ट करण्यात आली. याच ठिकाणाहून लिबियातील सगळ्या हालचाली होत असल्याचा अमेरिकेचा दावा आहे. तसेच गद्दाफी हे आपलं टार्गेट नसून त्यांचं लष्कर आणि हवाई यंत्रणा नष्ट करणे आपले उद्दीष्ट असल्याचे अमेरिकेनं म्हंटलंय.

अमेरिका आणि इतर देशांनी ताकीद देऊनही गद्दाफींनी संहार सुरूच ठेवला. बेंगाझीच्या पूर्वोत्तर शहरावर गद्दाफींच्या फौजांचा बॉम्बवर्षाव सुरूच आहे. अमेरिकेनंही लिबियामध्ये 20 ठिकाणी 110 टॉमहॉक मिसाईलचा मारा केला. दरम्यान ब्रिटननंही आपली चार लढाऊ विमाने लिबियाच्या दिशेने पाठवल्याचे समजतंय तर फ्रान्सच्या लढाऊ विमानांनी काही रनगाडे आणि शस्त्रवाहून नेणारी वाहनं उध्वस्त केली आहेत. दरम्यान स्पेन,इटली, कॅनडा आणि नेदरलँड या चार देशांनीही आता लिबियाविरोधातल्या कारवाईत सक्रीय सहभाग घेतल्याचं अमेरिकेने स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2011 08:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close