S M L

वर्ल्ड कप 'चॅम्पियन' उबंरठ्यावर

21 मार्चमहिनाभर झालेल्या 42 लीग मॅच आणि 14 टीममध्ये झालेले घमासान युद्ध. यानंतर आता वर्ल्ड कपच्या शेवटच्या 8 टीम ठरल्या आहे. अगदी शेवटची लीग मॅच होईपर्यंत क्वार्टर फायनलचे चित्र स्पष्ट होत नव्हते, इतकी चुरस या लीग मॅचेसमध्ये बघायला मिळाली. पण आता सरु होणार आहेत नॉक आऊट मॅच. आणि अशा 7 मॅचनंतर आपल्याला मिळणार आहे एक नवीन चॅम्पियन. या वर्ल्ड कपमध्ये दोन गोष्टी आतपर्यंत चांगल्या घडल्या आहेत. तर टेस्ट क्रिकेटचा दर्जा असलेल्या आठ सर्वोत्तम टीमच क्वार्टर फायनलला पोहोचल्या आहेत. आणि दुसरे म्हणजे बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये दर्जेदार मुकाबला काही लीग मॅचमध्ये बघायला मिळाला. ऑस्ट्रेलियाची 34 वर्ल्ड कप मॅचची विजय मालिका पाकिस्तानने संपवली. तर आयर्लंड आणि बांगलादेशने इंग्लंडला हरवण्याची किमया केली. ग्रुप ए मध्ये त्या मानाने चुरस कमी होती. आणि अपेक्षेप्रमाणेच ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, पाकिस्तान आणि न्यूझीलंडने क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली. तरीही एक आश्चर्य होतेच. पाकिस्तान टीमने पाच पैकी चार मॅच जिंकत या ग्रुपमध्ये आघाडी घेतली. त्यांच्या शेवटच्या लीग मॅचमध्ये तर त्यांनी वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियन टीमचा तीन विकेट राखून पराभव केला. बी ग्रुपमध्ये मात्र बांगलादेश आणि आयर्लंड टीमनी इंग्लंडच्या नाकी नऊ आणले. आणि अखेर दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा पराभव केल्यावर इंग्लंडच्या टीमने सुटकेचा निश्वास टाकला. पॉइंट टेबलमधील क्रमवारीही अगदी शेवटच्या लीग मॅचनंतरच स्पष्ट झाली. वेस्ट इंडिजवर विजय मिळवत भारताने दुसरा क्रमांक पटकावला. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आता क्वार्टर फायनलला सुरुवात होईल. आणि पहिलीच मॅच बुधवारी होईल ती पाकिस्तान आणि विंडिज दरम्यान. आणि त्याच्या दुसर्‍या दिवशी भारतीय टीमचा मुकाबला रंगेल तो ऑस्ट्रेलियाशी. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर ही मॅच रंगेल. दक्षिण आफ्रिकेचा मुकाबला न्यूझीलंडशी रंगेल तर शेवटची क्वार्टर फायनल होईल श्रीलंका आणि इंग्लंड दरम्यान. यात भारत आणि लंकन टीमला घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याचा फायदा मिळेल. आणि भारतापुरते बोलायचे तर ऑस्ट्रेलियाची विजयी मालिका पाकिस्तानने खंडीत केली आहे. तीनवेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या या टीमचे वर्ल्ड कपमधले आव्हान भारतीय टीम संपवू शकते का हे बघायचे आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 21, 2011 02:30 PM IST

वर्ल्ड कप 'चॅम्पियन' उबंरठ्यावर

21 मार्च

महिनाभर झालेल्या 42 लीग मॅच आणि 14 टीममध्ये झालेले घमासान युद्ध. यानंतर आता वर्ल्ड कपच्या शेवटच्या 8 टीम ठरल्या आहे. अगदी शेवटची लीग मॅच होईपर्यंत क्वार्टर फायनलचे चित्र स्पष्ट होत नव्हते, इतकी चुरस या लीग मॅचेसमध्ये बघायला मिळाली. पण आता सरु होणार आहेत नॉक आऊट मॅच. आणि अशा 7 मॅचनंतर आपल्याला मिळणार आहे एक नवीन चॅम्पियन.

या वर्ल्ड कपमध्ये दोन गोष्टी आतपर्यंत चांगल्या घडल्या आहेत. तर टेस्ट क्रिकेटचा दर्जा असलेल्या आठ सर्वोत्तम टीमच क्वार्टर फायनलला पोहोचल्या आहेत. आणि दुसरे म्हणजे बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये दर्जेदार मुकाबला काही लीग मॅचमध्ये बघायला मिळाला. ऑस्ट्रेलियाची 34 वर्ल्ड कप मॅचची विजय मालिका पाकिस्तानने संपवली. तर आयर्लंड आणि बांगलादेशने इंग्लंडला हरवण्याची किमया केली.

ग्रुप ए मध्ये त्या मानाने चुरस कमी होती. आणि अपेक्षेप्रमाणेच ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, पाकिस्तान आणि न्यूझीलंडने क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली. तरीही एक आश्चर्य होतेच. पाकिस्तान टीमने पाच पैकी चार मॅच जिंकत या ग्रुपमध्ये आघाडी घेतली. त्यांच्या शेवटच्या लीग मॅचमध्ये तर त्यांनी वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियन टीमचा तीन विकेट राखून पराभव केला.

बी ग्रुपमध्ये मात्र बांगलादेश आणि आयर्लंड टीमनी इंग्लंडच्या नाकी नऊ आणले. आणि अखेर दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा पराभव केल्यावर इंग्लंडच्या टीमने सुटकेचा निश्वास टाकला. पॉइंट टेबलमधील क्रमवारीही अगदी शेवटच्या लीग मॅचनंतरच स्पष्ट झाली. वेस्ट इंडिजवर विजय मिळवत भारताने दुसरा क्रमांक पटकावला.

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आता क्वार्टर फायनलला सुरुवात होईल. आणि पहिलीच मॅच बुधवारी होईल ती पाकिस्तान आणि विंडिज दरम्यान. आणि त्याच्या दुसर्‍या दिवशी भारतीय टीमचा मुकाबला रंगेल तो ऑस्ट्रेलियाशी. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर ही मॅच रंगेल. दक्षिण आफ्रिकेचा मुकाबला न्यूझीलंडशी रंगेल तर शेवटची क्वार्टर फायनल होईल श्रीलंका आणि इंग्लंड दरम्यान. यात भारत आणि लंकन टीमला घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याचा फायदा मिळेल.

आणि भारतापुरते बोलायचे तर ऑस्ट्रेलियाची विजयी मालिका पाकिस्तानने खंडीत केली आहे. तीनवेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या या टीमचे वर्ल्ड कपमधले आव्हान भारतीय टीम संपवू शकते का हे बघायचे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2011 02:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close