S M L

अमेरिका आणि युरोपियन देशांची लिबियावर लष्करी कारवाई

21 मार्चकर्नल गद्दाफींच्या लिबियावर अमेरिका, फ्रांस आणि इतर पाश्चिमात्य देशांनी हवाई कारवाईला सुरवात केली. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने लिबियाला नो फ्लाय झोन जाहीर केल्यानंतर या कारवाईला सुरवात झालीय. निदर्शकांना शांत करताना.. कर्नल गद्दाफी सामान्य नागरिकांचा बळी घेत आहे असा अमेरिकेचा दावा आहे. गद्दाफींनी युद्धबंदीची घोषणा केल्यानंतरही अमेरिकेचे हल्ले सुरू आहेत. गद्दाफी युद्धबंदीचं पालन करत नाही असा अमेरिकेचा दावा आहे. अमेरिका, फ्रांस आणि इतर देशांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत 50 लोकांचे प्राण गेले आहेत. गद्दाफींच्या निवासस्थानावर हल्लामित्र देशांनी सुरू केलेल्या कारवाईत कर्नल मुअम्मर गद्दाफींच्या निवासस्थानाचा काही भाग नष्ट झाला. पण गद्दाफींवर हल्ला करण्याचा मित्र राष्ट्रांचा इरादा नव्हता अमेरिकेनं ताबडतोब स्पष्ट केलं. हा हल्ला नेमका कुणी केला. कोणत्या शस्त्राने केला, हे अजूनपर्यंत स्पष्ट होऊ शकलं नाही. गद्दाफींचा बालेकिल्ला असलेल्या राजधानी ट्रायपोलीमध्ये या घटनेची तीव्र प्रतिक्रिया उमटली. थेट गद्दाफींच्या घराजवळ हल्ला झाल्याने काही स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली.दरम्यान, लिबियावर सुरू झालेल्या लष्करी कारवाईवरून जगभरामध्ये दोन गट पडले आहेत. अमेरिका, फ्रांस, ब्रिटन आणि अनेक युरोपीय देशांनी या कारवाईचं समर्थन केलंय. तर दुसरीकडे ब्राझील, रशिया, भारत आणि चीनने या कारवाईला विरोध केलाय.अरब लीगने केला निषेधलिबियावर अमेरिका आणि मित्रपक्षांनी सुरू केलेल्या कारवाईला अरब लीगने पाठिंबा दिला होता. पण आता मात्र लीग पुनर्विचार करतंय. अरब लीगचे सरचिटणीस अमर मौसा यांनी लिबियावरच्या बाँबिंगचा निषेध केलाय आणि या हल्ल्यावर नेमकी काय भूमिका घ्यायची यासाठी लवकरच सर्व अरब देशांची बैठक घेण्यात येईल. असंही सांगितलं. त्यामुळे पाश्चिमात्त्य देशांना स्थानिक पाठिंबा मिळणं कठीण झालंय. संयुक्त राष्ट्रांनी लिबियावर नो फ्लाय झोन लावला. कर्नल गद्दाफींनी निदर्शकांवर हल्ले करण्यासाठी हवाई दल वापरलं. तर त्याचा समाचार घेण्यासाठी अमेरिकन आणि फ्रेंच हवाई ताफे तयार आहेत. शेजारच्या इजिप्तमध्ये या पाश्चिमात्त्य आक्रमणाला काहींनी पाठिंबा दिला आहे.गडाफींनी आंतर्राष्ट्रीय समुदायासमोर दुसरा पर्यायच ठेवला नाही. ते स्वतःच्याच लोकांना मारत आहे. पण इजिप्तमध्ये लिबियावरच्या या कारवाईचं सगळे समर्थन करत नाही. म्हणूनच.. इजिप्तच्या लष्काराने गद्दाफींविरुद्ध हल्ल्यात सहभागी होण्यास नकार दिला. गद्दाफींनी म्हटलंय की, लिबियारवची कारवाई म्हणजे पाश्चिमात्त्य देशांनी अरब जगतावर केलेलं आक्रमण आहे. म्हणूनच या कारवाईला अधिष्ठान मिळवण्यासाठी अरब देशांचा पाठिंबा मिळवणं अमेरिकेसाठी गरजेचं आहे. रविवारी अमेरिकेच्या ऍडमिरल माईक मलन यांनी जाहीर केलं की कतारचं सैन्य लिबियाच्या दिशेनं कूच करणार आहे. पण कतार नेमकी काय भूमिका निभावणार हे अस्पष्ट आहे. आणि इतिहास पाहता, एक अरब देश दुसर्‍या अरब देशावर हल्ला करण्याची शक्यताही धूसर आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 21, 2011 05:47 PM IST

अमेरिका आणि युरोपियन देशांची लिबियावर लष्करी कारवाई

21 मार्च

कर्नल गद्दाफींच्या लिबियावर अमेरिका, फ्रांस आणि इतर पाश्चिमात्य देशांनी हवाई कारवाईला सुरवात केली. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने लिबियाला नो फ्लाय झोन जाहीर केल्यानंतर या कारवाईला सुरवात झालीय. निदर्शकांना शांत करताना.. कर्नल गद्दाफी सामान्य नागरिकांचा बळी घेत आहे असा अमेरिकेचा दावा आहे. गद्दाफींनी युद्धबंदीची घोषणा केल्यानंतरही अमेरिकेचे हल्ले सुरू आहेत. गद्दाफी युद्धबंदीचं पालन करत नाही असा अमेरिकेचा दावा आहे. अमेरिका, फ्रांस आणि इतर देशांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत 50 लोकांचे प्राण गेले आहेत. गद्दाफींच्या निवासस्थानावर हल्ला

मित्र देशांनी सुरू केलेल्या कारवाईत कर्नल मुअम्मर गद्दाफींच्या निवासस्थानाचा काही भाग नष्ट झाला. पण गद्दाफींवर हल्ला करण्याचा मित्र राष्ट्रांचा इरादा नव्हता अमेरिकेनं ताबडतोब स्पष्ट केलं. हा हल्ला नेमका कुणी केला. कोणत्या शस्त्राने केला, हे अजूनपर्यंत स्पष्ट होऊ शकलं नाही. गद्दाफींचा बालेकिल्ला असलेल्या राजधानी ट्रायपोलीमध्ये या घटनेची तीव्र प्रतिक्रिया उमटली. थेट गद्दाफींच्या घराजवळ हल्ला झाल्याने काही स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली.दरम्यान, लिबियावर सुरू झालेल्या लष्करी कारवाईवरून जगभरामध्ये दोन गट पडले आहेत. अमेरिका, फ्रांस, ब्रिटन आणि अनेक युरोपीय देशांनी या कारवाईचं समर्थन केलंय. तर दुसरीकडे ब्राझील, रशिया, भारत आणि चीनने या कारवाईला विरोध केलाय.अरब लीगने केला निषेध

लिबियावर अमेरिका आणि मित्रपक्षांनी सुरू केलेल्या कारवाईला अरब लीगने पाठिंबा दिला होता. पण आता मात्र लीग पुनर्विचार करतंय. अरब लीगचे सरचिटणीस अमर मौसा यांनी लिबियावरच्या बाँबिंगचा निषेध केलाय आणि या हल्ल्यावर नेमकी काय भूमिका घ्यायची यासाठी लवकरच सर्व अरब देशांची बैठक घेण्यात येईल. असंही सांगितलं. त्यामुळे पाश्चिमात्त्य देशांना स्थानिक पाठिंबा मिळणं कठीण झालंय.

संयुक्त राष्ट्रांनी लिबियावर नो फ्लाय झोन लावला. कर्नल गद्दाफींनी निदर्शकांवर हल्ले करण्यासाठी हवाई दल वापरलं. तर त्याचा समाचार घेण्यासाठी अमेरिकन आणि फ्रेंच हवाई ताफे तयार आहेत. शेजारच्या इजिप्तमध्ये या पाश्चिमात्त्य आक्रमणाला काहींनी पाठिंबा दिला आहे.

गडाफींनी आंतर्राष्ट्रीय समुदायासमोर दुसरा पर्यायच ठेवला नाही. ते स्वतःच्याच लोकांना मारत आहे. पण इजिप्तमध्ये लिबियावरच्या या कारवाईचं सगळे समर्थन करत नाही. म्हणूनच.. इजिप्तच्या लष्काराने गद्दाफींविरुद्ध हल्ल्यात सहभागी होण्यास नकार दिला.

गद्दाफींनी म्हटलंय की, लिबियारवची कारवाई म्हणजे पाश्चिमात्त्य देशांनी अरब जगतावर केलेलं आक्रमण आहे. म्हणूनच या कारवाईला अधिष्ठान मिळवण्यासाठी अरब देशांचा पाठिंबा मिळवणं अमेरिकेसाठी गरजेचं आहे. रविवारी अमेरिकेच्या ऍडमिरल माईक मलन यांनी जाहीर केलं की कतारचं सैन्य लिबियाच्या दिशेनं कूच करणार आहे. पण कतार नेमकी काय भूमिका निभावणार हे अस्पष्ट आहे. आणि इतिहास पाहता, एक अरब देश दुसर्‍या अरब देशावर हल्ला करण्याची शक्यताही धूसर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2011 05:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close