S M L

कॅश फॉर वोट्सच्या मुद्यावरून संसदेत पुन्हा रणकंदन

23 मार्चकॅश फॉर वोट्सच्या मुद्द्याने आज संसदेत पुन्हा एकदा रणकंदन माजलं. विकिलिक्सने पुढे आणलेल्या माहितीच्या आधारावर आज लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात दिवसभर चर्चा झाली. ही चर्चा प्रामुख्याने तीन मुद्द्यांभोवती झाली. पहिला मुद्दा होता विकिलिक्सच्या सत्यतेचा. विरोधकांची भाषणं ही विकिलिक्सच्या केबलमधील माहितीवरच आधारली होती. तर सरकारने या केबल्स निराधार असल्याचा दावा केला. विविध देशांचे राजदूत काय लिहितात. हे पडताळणं शक्य नसल्याचे पंतप्रधान म्हणाले. दुसरा मुद्दा होता कॅश फॉर वोट्सच्या आतापर्यंतच्या तपासाचा. हा तपास मंद गतीने होत असून सरकार त्यात हस्तक्षेप करतंय, असा आरोप विरोधकांनी केला. तर सरकारने मात्र तपास पूर्ण होण्यापर्यंत विरोधकांना संयम ठेवण्याचे आवाहन केलं.तिसरा मुद्दा होता सीएनएन-आयबीएनने केलेल्या स्टिंग ऑपरेशनचा. भाजपचे खासदार सरकार विकत घेत असल्याचे या स्टिंग ऑपरेशनमुळे स्पष्ट झालं होतं. असा भाजपचे खासदार म्हणाले. तर 2008 साली भाजपने जाणून बुजून आपले खासदार विकायला काढले होते. भाजपनेच हे स्टिंग ऑपरेशन घडवून आणलं होतं असा आरोप आजच प्रसिद्ध झालेल्या एका मासिकातल्या बातमीचा हवाला देत कपिल सिब्बल यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 23, 2011 05:36 PM IST

कॅश फॉर वोट्सच्या मुद्यावरून संसदेत पुन्हा रणकंदन

23 मार्च

कॅश फॉर वोट्सच्या मुद्द्याने आज संसदेत पुन्हा एकदा रणकंदन माजलं. विकिलिक्सने पुढे आणलेल्या माहितीच्या आधारावर आज लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात दिवसभर चर्चा झाली. ही चर्चा प्रामुख्याने तीन मुद्द्यांभोवती झाली. पहिला मुद्दा होता विकिलिक्सच्या सत्यतेचा. विरोधकांची भाषणं ही विकिलिक्सच्या केबलमधील माहितीवरच आधारली होती.

तर सरकारने या केबल्स निराधार असल्याचा दावा केला. विविध देशांचे राजदूत काय लिहितात. हे पडताळणं शक्य नसल्याचे पंतप्रधान म्हणाले. दुसरा मुद्दा होता कॅश फॉर वोट्सच्या आतापर्यंतच्या तपासाचा. हा तपास मंद गतीने होत असून सरकार त्यात हस्तक्षेप करतंय, असा आरोप विरोधकांनी केला. तर सरकारने मात्र तपास पूर्ण होण्यापर्यंत विरोधकांना संयम ठेवण्याचे आवाहन केलं.

तिसरा मुद्दा होता सीएनएन-आयबीएनने केलेल्या स्टिंग ऑपरेशनचा. भाजपचे खासदार सरकार विकत घेत असल्याचे या स्टिंग ऑपरेशनमुळे स्पष्ट झालं होतं. असा भाजपचे खासदार म्हणाले. तर 2008 साली भाजपने जाणून बुजून आपले खासदार विकायला काढले होते. भाजपनेच हे स्टिंग ऑपरेशन घडवून आणलं होतं असा आरोप आजच प्रसिद्ध झालेल्या एका मासिकातल्या बातमीचा हवाला देत कपिल सिब्बल यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 23, 2011 05:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close