S M L

गद्दाफींच्या विरूध्द अमेरिकेचा कारवाईचा पवित्रा

23 मार्चलिबियावर सुरू असलेल्या दोस्त राष्ट्रांच्या हल्ल्याचा आजचा पाचवा दिवस आहे. लिबियाचे राष्ट्राध्यक्ष मुअम्मर गद्दाफींनी नागरिकांवर हल्ले करणं बंद केल्याशिवाय कारवाई थांबवणार नाही असा इशारा अमेरिकेने दिला आहे. राजधानी ट्रिपोलीत आजही जोरदार गोळीबार आणि बॉम्बहल्ले सुरूच आहेत. गद्दाफी यांनी पहिल्यांदाच आज लोकांसमोर येऊन शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान या हल्ल्याचं नेतृत्व इतर देशांकडे सोपवण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केली. पण नेतृत्व कुणी करावे यावरून दोस्त राष्ट्रांमध्ये मतभेद आहेत. तर दोस्त राष्ट्रांनी तात्काळ युद्धबंदी जाहीर करावी अशी मागणी रशिया आणि चीननं केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 23, 2011 05:47 PM IST

गद्दाफींच्या विरूध्द अमेरिकेचा कारवाईचा पवित्रा

23 मार्च

लिबियावर सुरू असलेल्या दोस्त राष्ट्रांच्या हल्ल्याचा आजचा पाचवा दिवस आहे. लिबियाचे राष्ट्राध्यक्ष मुअम्मर गद्दाफींनी नागरिकांवर हल्ले करणं बंद केल्याशिवाय कारवाई थांबवणार नाही असा इशारा अमेरिकेने दिला आहे. राजधानी ट्रिपोलीत आजही जोरदार गोळीबार आणि बॉम्बहल्ले सुरूच आहेत. गद्दाफी यांनी पहिल्यांदाच आज लोकांसमोर येऊन शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान या हल्ल्याचं नेतृत्व इतर देशांकडे सोपवण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केली. पण नेतृत्व कुणी करावे यावरून दोस्त राष्ट्रांमध्ये मतभेद आहेत. तर दोस्त राष्ट्रांनी तात्काळ युद्धबंदी जाहीर करावी अशी मागणी रशिया आणि चीननं केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 23, 2011 05:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close