S M L

चिंटू शेख हल्ला प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे

24 मार्चमुंबई हायकोर्टाने चिंटू शेख हल्ला प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे यांनी चिंटू शेख यांच्यावर गोळीबार केल्याचं हे प्रकरण आहे. न्यायमूर्ती ए एम खानविलकर आणि ए आर जोशी यांच्या दोन सदस्यीय खंडपीठाने हा आदेश दिला. चिंटू शेख याने 23 सप्टेंबर 2010 रोजी पवई पोलिसांकडे राणे यांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याची तक्रार नोंदवली होती. मात्र नारायण राणे यांच्या दडपणामुळे पोलीस योग्य तो तपास करत नाही अशी याचिकाही चिंटू शेखने हायकोर्टात दाखल केली होती. राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला होता. हायकोर्टाने या प्रकरणी पोलिसांना व्हिडिओ आणि पंचनामा तसेच साक्षीदार याबद्दलचा पुरावा कोर्टाकडे सोपवायला सांगितलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 24, 2011 09:16 AM IST

चिंटू शेख हल्ला प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे

24 मार्च

मुंबई हायकोर्टाने चिंटू शेख हल्ला प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे यांनी चिंटू शेख यांच्यावर गोळीबार केल्याचं हे प्रकरण आहे. न्यायमूर्ती ए एम खानविलकर आणि ए आर जोशी यांच्या दोन सदस्यीय खंडपीठाने हा आदेश दिला. चिंटू शेख याने 23 सप्टेंबर 2010 रोजी पवई पोलिसांकडे राणे यांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याची तक्रार नोंदवली होती.

मात्र नारायण राणे यांच्या दडपणामुळे पोलीस योग्य तो तपास करत नाही अशी याचिकाही चिंटू शेखने हायकोर्टात दाखल केली होती. राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला होता. हायकोर्टाने या प्रकरणी पोलिसांना व्हिडिओ आणि पंचनामा तसेच साक्षीदार याबद्दलचा पुरावा कोर्टाकडे सोपवायला सांगितलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2011 09:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close